‘कमळ, कमळ’नंतर ‘नमो नमो’चा जप ; भाजपाचा ब्रेथलेस नेता काही केल्या थांबेना ! व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपू्र्वी भाजपा नेते विनित अग्रवाल शारदा यांचा सलग कमळ कमळ असा म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते नमो, नमो असे सलग आणि वेगाने म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यांची बोलण्याची गती फारच तीव्र असून ऐकणाऱ्याला ती बुचकळ्यात पाडते.

काही दिवसांपूर्वीच विनित शारदा यांनी मेरठमध्ये झालेल्या रॅलीत लोकांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. परंत हे करत असताना त्यांनी मात्र 36 सेकंदात वारंवार आणि वेगाने कमळ शब्द उच्चारला होता. हे म्हणताना त्यांना धाप लागली तरीही ते थांबले नाही.

त्यांनी 17 सेकंदात 27 वेळा कमळ, कमळ, कमळ असा शब्द उच्चारला होता. विनित यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. अनेकजणांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरणे अवघड झाले होते. 17 सेकंदात 27 वेळा कमळ शब्द उच्चारूनही ते थांबले नाही त्यांनी शेवटच्या 18 सेकंदातही त्यांनी 6 वेळा कमळ शब्द उच्चरला. यावरच ते थांबले नाही. त्यांनी कमळ बटण दाबा अस आवाहन करताना म्हटलं होतं की, “कमळासमोरचं बटण इतक्या वेळा दाबा की, मोदी रामाच्या रुपात प्रकट झाले पाहिजेत” असे अजब विधानही त्यांनी यावेळी केले होते. ते ऐकून अनेकजण चक्रावले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेही यावेळी उपस्थित होते.