कंगनाच्या ऑफिसमध्ये BMC कडून तोडफोड, अभिनेत्री म्हणाली – ‘लोकशाहीची हत्या’

पोलिसनामा ऑनलाईन – कंगना रनौतच्या मुंबई येथील कार्यलयात बीएमसीच्या टीमने कारवाईला सुरुवात केली आहे. बीएमसीने कंगनाला अवैध बांधकाम आणि योजनेनुसार बांधकाम न केल्याच्या आरोपात नोटीस बजावली होती. बुधवारी सकाळी पालिकेने कार्यालयात तोडफोडीची कारवाई सुरू केली. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकीने बीएमसीकडे सात दिवसांचा वेळ मागितला होता, पण बीएमसीने अधिक वेळ देण्यास नकार दिला आहे.

कंगनाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केलेला आहे. तिने ट्विटरवर कार्यालयाबाहेरील एक फोटो पोस्ट केला आणि प्रशासनाची तुलना बाबरशी केली.

कंगनाने दुसर्‍या ट्विटमध्ये कार्यालयाच्या आतील तोडफोडीचे फोटो शेअर करत लिहिले, ‘पाकिस्तान’. तिने लिहिले की, तिच्या शत्रूंनी आता सिद्ध केले आहे कि का मुंबई आता पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) आहे.

बीएमसीचा आरोप
बीएमसीचे म्हणणे आहे की, कंगनाचे कार्यालय बनवताना नियमांचे उल्लंघन केले गेले आहे. बीएमसीचे म्हणणे आहे की, कंगनाच्या कार्यालयात योजनेनुसार बांधकाम केले गेले नाही. दुसर्‍या मजल्याच्या स्लॅबमध्ये तीन इंचाची जागा अधिक दिसून येत आहे. कागदावर जिथे बाथरूम दर्शवले गेले आहे, तिथे मोकळी जागा दिसत आहे.

बीएमसीने कंगनाला उत्तर देण्यासाठी २४ तासाचा वेळ दिला होता आणि त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी सकाळी बीएमसीची टीम बुलडोजर घेऊन कार्यालयात पोहोचली.