बहिण रंगोलीनं ट्विट करत सांगितल्या ‘प्रायव्हेट’ गोष्टी, कंगना रणौत ‘भडकली’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही वक्तव्य करत असते आणि चर्चेत येत असते. अलीकडेच रिलीज झालेल्या तापसी पन्नू स्टारर थप्पड या सिनेमाबद्दल चर्चा करताना रंगोलीनं अशी काही चूक केली की, तिची बहिण कंगनाही नाराज झाली आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1236552890384125952

https://twitter.com/Rangoli_A/status/1236553516203696128

रंगोली ट्विटरवर तापसी पन्नूचा सिनेमा थप्पडवर आपलं मत मांडत होती. याचवेळी तिनं तिची आणि कंगनाची प्रायवेट बातचितही सांगितली. यानंतर कंगना तिच्यावर भडकली. कंगनानं तिला तसं न करण्यासाठी सांगितलं. रंगोलीनं स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1236554186310868992

https://twitter.com/Rangoli_A/status/1236558921424199681

या ट्विटमध्ये रंगोलीनं बागी 3 चे डायरेक्टर अहमद खान यांच्या त्या दाव्याचाही उल्लेख केला होता ज्यात त्यांनी अलीकडेच असं म्हटलं होतं की, एका महिलेनं पतीनं एकदा थप्पड मारली म्हणजे सोडून देणं हे माझ्या समजण्या पलीकडे आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यानं वादाला तोंड फोडलं होतं. अहमद खाननं थप्पडबद्दल हे वक्तव्य केलं होतं.

https://twitter.com/Rangoli_A/status/1236559551630991360

रंगोलीनं ट्विट करत म्हटलं की, “मी कंगनाला म्हटलं की, थप्पडवरून विवाद सुरू आहे यावर तू काय म्हणशील ? यावर ती म्हणाली, जर असा साथी मला थप्पड मारत असेल तर मी त्याला थोड्या वेळासाठी घरातून बाहेर पाठवलं असतं. ती त्याला काही महिने किंवा वर्षभर एकट सोडलं असतं. परंतु जर त्याला त्याची चूक कळली असती तर मी त्याला कायमस्वरूपी सोडणार नाही.”