Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये करण जोहरचे झाले असे हाल, मुलं म्हणाली – ‘बुढा हो गया’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता, देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यावेळी अनेक कामे रखडली आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीबद्दल बोलायचे म्हणले तर, अगदी या लॉकडाउनमध्येही, त्यांचा ग्लॅमरस अवतार सोडून ते एका सामान्य माणसासारखे दिसत आहे. अलीकडे लॉकडाऊन दरम्यान करण जोहरने आपला नवा लूक फ्लॉन्ट केला आहे. लॉकडाउनमध्ये करण जोहर आपल्या पांढऱ्या केसांना कलर करु शकत नाही आणि त्याने तसाच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच वरुण धवनसोबत थेट चॅट दरम्यान करण जोहरने आपल्या पांढऱ्या केसांबद्दल चर्चा केली आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी करण जोहर लॉकडाऊन दरम्यान वरुण धवनसोबत थेट चॅटवर चर्चा केली. यावेळी, तो पांढऱ्या केसांसह दिसला. करण जौहरला या लूकमध्ये पाहून वरुण धवन आश्चर्यचकित झाला, पण राखाडी केसांमुळे तो खरोखरच चांगला दिसत असल्याचेही त्याने मान्य केले. या लूकवर करण जोहर म्हणाला की, लॉकडाऊन दरम्यान कोणताही पर्याय नसतो, म्हणून आता मी हा लूक स्वीकारला आहे. तो म्हणाला की, मी प्रथमच असा लुक अनुभवला आहे.

वरुण धवनने करण जोहरला सांगितले की, लाइव्ह चॅटमध्ये बरेच लोक असे म्हणत आहेत की या लूकमुळे करण जोहर खूप हॉट दिसत आहे. यावर करण जोहर म्हणतो, ‘मला माहित नाही पण माझी मुले असं म्हणत आहेत की मी अचानक म्हातारा झालो आहे.’ इतकेच नाही तर करणचा हा लुक पाहून वरुण धवनने त्याला ‘बॉन्ड व्हिलन’ ची कमेंट दिली आहे.

त्याचबरोबर या लाइव्ह चॅटनंतर करण जोहरनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पांढऱ्या केसांसोबत स्वत: चे एक जबरदस्त आकर्षक फोटो शेअर केले आहे. यापूर्वी करण आपल्या मुलांच्या गैरवर्तनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसला होता पण तो नेहमीच कॅमेर्‍याच्या मागे राहिला.