‘बॉबी’ सिनेमातील ‘मैं शायर तो नहीं’ गाण्यात दिसला करण जोहर, ऋषी कपूरच्या मुलीनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड डायरेक्टर आणि प्रोड्युसर करण जाोहर यानं एक व्हिडीओ शेअर केला ज्यानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या या व्हिडीओची सोशलवर खूप चर्चा होताना दिसत आहे.

करणनं त्याच्या इंस्टारून एक व्हिडीओ शेअर केला आहे. बॉबी सिनेमातील मैं शायर तो नहीं या गाण्याचा तो व्हिडीओ आहे. खास बात अशी की, यात ऋषी कपूर नाही तर करण जोर दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं खास कॅपशन दिलं आहे. कॅप्शनमध्ये करण म्हणतो, “ही फेस मॅपिंगची जादू आहे.” करणनं हेही सांगितलं की, हा व्हिडीओ फिल्ममेकर संदीपनं त्याला भेट म्हणून दिला आहे. करणनं लिहलं की, राज कपूर माझे आवडते फिल्ममेकर होते आणि ऋषी कपूर आवडते अ‍ॅक्टर. या गिफ्टसाठी संदीपचे आभार.”

खास बात अशी की, या पोस्टवर ऋषी कूपूर यांची मुलगी रिद्धीमा हिनंही प्रतिक्रिया दिली आहे. तिनं कमेंटमध्ये क्लॅपिंग आणि हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. याशिवाय सिंगर विशाल ददलानी यानंही लिहिलं की, हे लिजेंडरी आहे.

बॉही सिनेमात ऋषी कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया, प्रेम नाथ, दुर्गा खोटे, अरुणा इराणी यांसारख्या कलाकारांनी काम केलं आहे. 1973 हा सिनेमा रिलीज झाला होता. यासाठी ऋषीला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्डही मिळाला आहे. राज कपूर यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला होता.