सेल्फी मागणाऱ्या मुलीवर भडकली ‘बेबो’ करीना, ट्रोलर्स म्हणाले – ‘सो कॉल्ड स्टार’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर हिनं नुकतेच होळीचे फोटो शेअर केले होते. यात तिनं जास्त रंग लावला नव्हता. गालावर हलका गुलबी रंग लावत तिनं सांगितलं होतं की, गुलाबी मझा रंग आहे. तिनं जास्त रंगही खेळला नाही. विशेष म्हणजे तिचा मूडही काही विशेष नसल्याचं दिसून आलं. सध्या करीनाचा एक व्हिडीओ समोर आला आह जो व्हायरल होत आहे. यात दिसत आहे की, एक चाहती तिला सेल्फीसाठी डीमांड करत आहे. परंतु करीनाचं काही वेगळंच बिहेव करत आहे.

एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात दिसतंय की, करीना आपला लाडका तैमूरला घेऊन रस्ता क्रॉस करत होती. अनेकजण तिला हॅप्पी होली म्हणाले. परंतु तिनं काहीच उत्तर दिलं नाही. ती पुढेच जात होती. करीना जेव्हा आपल्या बंगल्याजवळ येते तेव्हा 2 चाहते तिला सेल्फीची मागणी करतात. हे ऐकून करीना थांबतेही यावेळीच असं काही घडतं की, लोकांना ते विचित्र वाटतं. जेव्हा दोन मुली करीनासोबत सेल्फी घेऊ लागतात तेव्हा ती ताडकन तिथून निघून जाते.

करीनानं ज्या पद्धतीनं वर्तन केलं आहे ते पाहून सारेच लोक तिला ट्रोलर करत आहेत. अनेकांनी कमेंट करत तिच्यावर टीका केली आहे. एका युजरनं म्हटलं की, किती ईगो. एकानं कमेंट केली की, अॅरोगन्स एका वेगळ्याच लेवलला आहे. फक्त दोनच मुली होत्या ज्या सेल्फी मागत होत्या. खूप मोठी गर्दीही नव्हती.”

एकानं तर भली मोठी कमेंट केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, “दोन मुलींना हँडल करता आलं नसतं असं तरअजिबात नाही. हे तेच स्टार्स आहे जे सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान लोकांसमोर गयावया करतात की आमचा सिनेमा पहा. जेव्हा स्टार होतात तेव्हा त्यांचा तोरा वेगळ्याच लेवलला असतो. ते एक गोष्ट विसरतात की, आज ते जे काही आहेत ते पब्लिकमुळेच आहेत.” अनेकांनी तिला सो कॉल्ड स्टार म्हटलं आहे.