भाजपचे नाराज आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकीय ‘भूकंप’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकात येडीयुरोप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने सत्ता स्थापन केली. मात्र नुकतेच भाजपाचे काही नाराज आमदार काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. यामुळे कर्नाटकच्या राजकारणात चांगलाच भूकंप झाला आहे. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, भाजपाच्या काही असंतुष्ट आमदारांनी आमच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे.

मे 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र त्यानंतर स्थापन झालेले कुमारस्वामी सरकार लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे 14 महिन्यांतच कोसळले.

आता पुन्हा काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. जारकीहोळी म्हणाले आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आम्ही प्रत्येकाला पक्षात घेऊ शकत नाही किंवा सर्वांना सोडूही शकत नाही. हे विधानसभा मतदारसंघांच्या स्थितीवर अवलंबून असेल. तसेच याबाबत मी हायकमांडशी बोललेलो आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आता प्रचारात गुंतले आहेत. असेही जारकीहोळी यांनी सांगितले.

कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे येडीयुरोप्पा यांनी आपले सरकार स्थापन केले होते हे सरकार स्थिर असल्याचे समजले जात होते मात्र आता येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार काहीसे स्थिर असल्याचे दिसत असतानाचा काँग्रेस आमदारांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकता अस्थिरता निर्माण झाली आहे.

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा भाजपसाठी महत्वाच्या ठरणार आहेत. सध्या कर्नाटक विधानसभेत भाजपाकडे 106 आमदारांचे पाठबळ आहे भाजपला पोटनिवडणुकीमध्ये किमान सहा जागा जिंकाव्या लागणार आहे. मात्र या पोटनिवडणुकीसाठी आमचे कार्यकर्ते तयारीला लागले असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी