‘प्रियांका गांधी तुम्ही लोकसभा पोटनिवडणूक लढविणार का ?’; काँग्रेस खासदाराचे पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यानंतर भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) सारख्या विविध पक्षांतील नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या देखील सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. मात्र, ते निवडणूक लढवणार का, अशी विनंती करणारे पत्र एका खासदाराने दिले आहे.

प्रियांका गांधी यांनी आत्तापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी दबाव वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अजून काहीकाळ बाकी आहे. मात्र, तमिळनाडूमध्ये कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रियांका गांधी यांनी लढवावी यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांकडून विनंती केली जात आहे. त्यानुसार, माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी पक्षाच्या राज्य निवडणूक समितीला पत्र लिहून विनंती केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की प्रियांका गांधी यांनी तमिळनाडूच्या कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी.

खासदार वसंत कुमार यांच्या निधनाने जागा रिक्त

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने त्यांना 10 ऑगस्टमध्ये चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, 28 ऑगस्टला त्यांचे निधन झाले. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. मात्र, आता या जागेसाठी मतदान घेतले जाणार आहे.