LGBTQ च्या मुद्यावर ‘आयुष्मान-कार्तिक’चे सिनेमे समोरा-समोर, कोण मारणार ‘बाजी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यननं आज इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. लवकरच कार्तिक, करण जोहरच्या दोस्ताना 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कार्तिकचा लिड रोल आहे. 2008 साली आलेल्या दोस्ताना या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे.

आयुष्मान-कार्तिकची बॉक्स ऑफिसवर टक्कर
दोस्ताना 2 हा सिनेमादेखील पहिल्या पार्टप्रमाणे समलैंगिक नात्यावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा LGBTQ समाजाच्या अवती भोवती फिरणार आहे. परंतु याच मुद्द्यावर भाष्य करणारा आयुष्मान खुरानाचा शुभमंगल ज्यादा सावधान हा सिनेमा रिलीज होणार आहे. आयुष्मानचा सिनेमा दोस्ताना 2 या सिनेमाच्या खूप आधीच रिलीज होणार आहे. अशात असा प्रश्न पडतो की, लोक एकाच मुद्द्यावर भाष्य करणारे दोन सिनेमे पाहतील का ? याचा सिनेमांवरील कमाईवर परिणाम होईल का ?

जेव्हा हे प्रश्न कार्तिकला विचारण्यात आले तेव्हा कार्तिक म्हणाला, “बॉक्स ऑफिसवरील आकडे मॅटर करत नाहीत. बॉक्स ऑफिसपेक्षा जास्त LGBTQ समाजाचे प्रश्न मांडले जाणं गरजेचं आहे. बॉलिवूडनं या मुद्द्यावर एकता दाखवली आहे. मला वाटतं की, शुभमंगल ज्यादा सावधान आणि दोस्ताना 2 हे सिनेमे एकदम वेगळे आहेत. इथे हार-जीत असा विषय नाही.”

आयुष्मानचा शुभमंगल ज्यादा सावधान 21 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. कार्तिकचा दोस्ताना 2 हा सिनेमा याचवर्षी पडद्यावर येणार आहे. या सिनेमात कार्तिक व्यतिरीक्त जान्हवी कपूरही दिसणार आहे.