कात्रज चौकात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; एकाच जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज चौकात भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार तरुणाच्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान ट्रक चालक पसार झाला आहे.

निलेश लक्ष्मण दौड (वय 21, रा. भोर, सध्या रा. कात्रज) असे मृत्यू झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश आणि त्याचा मित्र रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रज चौकातुन दुचाकीने घरी जात होते. यावेळी निलेशचा मित्र दुचाकी चालवत होता. तर निलेश मागे बसला होता. अंबिका हॉटेल समोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात निलेश याला गंभिर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मित्रालाही जबर मार लागला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान गर्दीच्या वेळीच अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक चालक घटनास्थळी न थांबता ठेतून पसार झाला. माहिती मिळताच भारती विद्यपीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाहतूक पूर्ववत करत तरुणांना रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास भारती विद्यपीठ पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  

 

You might also like