केरळमध्ये Air India Express च्या विमानाला मोठा अपघात

तिरूअनंतपूरम : वृत्तसंस्था – केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर शुक्रवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. दुबईवरून केरळमधील करीपूर एअरपोर्टवर लॅन्डिग करताना धावपट्टीवर विमान घसरलं.

विमानामध्ये तब्बल 180 हून जास्त प्रवासी होते. दुबई-कोझिकोड बोईंग 737 या विमानामध्ये तब्बल 184 प्रवासी असल्याचं समजतंय. हे विमान एअरपोर्टवर रात्री 7.41 वाजता लॅन्ड झालं. प्राथमिक माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं आहे. बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे.

दरम्यान, विमानामध्ये 6 क्रू मेंमबर होते. एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. या दुर्घटनेमध्ये पायलटसह तिघांचा मृत्यू झाल्याचं विविध राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. मात्र, त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like