तलाक प्रकरणात केरळ हायकोर्टानं केली मोठी टिपण्णी, सुनेकडून घरातील काम करून घेणं सामान्य बाब

तिरुवनंतपुरम : तलाक प्रकरणात केरळ हायकोर्टने एक मोठी टिपण्णी केली आहे. कोर्टाने म्हटले की, मोठ्यांनी छोट्यांना ओरडणे आणि कधी-कधी अपशब्द बोलणे सामान्य बाब आहे. सुनेकडून घरातील कामे करून घेणे सुद्धा सामान्य बाब आहे. केरळ उच्च न्यायालयाने ही टिपण्णी मागील आठवड्यात एका व्यक्तीच्या तलाक प्रकरणाची याचिका स्वीकारताना केली.

यामध्ये त्या व्यक्तीने म्हटले होते की, त्याच्या पत्नीने त्यास आईपासून दूर राहण्यासाठी सक्ती केली आणि मानसिक यातना देत होती. जस्टिस एएम शफीक यांच्या नेतृत्वात दोन जजच्या खंडपीठाने, ही व्यक्ती दारूडी बनण्यासाठी सुद्धा पत्नीने वेगळे राहण्यासाठी केलेली सक्तीच कारणीभूत असल्याचे सांगितले.

न्यायालयाने म्हटले, घेतलेल्या साक्षींमधून हेच दिसते की, प्रतिवादी आणि याचिकाकर्त्याच्या आईमध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत होती. अशा परिस्थितीत पत्नीसाठी सुद्धा हे स्वाभाविक आहे की तीने आपल्या पतीला कौटुंबिक जीवनापासून वेगळे ठेवण्याचा सतत प्रयत्न करेल, आणि ही गोष्टी निशंक पतीसाठी तणावपूर्ण राहिली असणार.

न्यायालयाने पुढे म्हटले, या प्रकरणात याचिकाकर्ता दारूडा बनण्यास केवळ प्रतिवादीने आईपासून दूर राहण्यासाठी वेगळे घर घेण्यासाठी टाकलेला दबाव कारणीभूत असू शकतो.