‘या’ मजूराची रात्रीतून बदलली ‘लाईफ’, बनला करोडपती अन् मिळाले 12 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमधील कन्नूर येथील एका मजुराचे आयुष्य रात्रीतून पालटले आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या पेरून्नन राजनला एक-दोन नव्हे तर 12 कोटींची लॉटरी लागली आहे. टॅक्स कपात झाल्यानंतरही त्यांना किमान 7 कोटी मिळणार आहे. जिंकलेल्या पैशातून राजनला आपल्या कुटूंबानंतर गरजूंसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे.

पेरुन्नन राजन (वय 58) हा कन्नूरमधील मालूरमधील थोलांबरा परिसरातील रहिवासी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही तो दररोज लॉटरी खरेदी करतो. एक दिवस नशीब नक्कीच आपली साथ देईल, असा त्याचा विश्वास होता. शेवटी, त्याचे नशिब 10 फेब्रुवारी रोजी चमकले आणि त्याला 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली.

राजन यांनी ‘केरळ ख्रिसमस न्यू इयर बम्पर’ लॉटरी खरेदी केली. सोमवारी याचा ड्रॉ लागला. ज्यामध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. राजन म्हणाले कि, ‘जेव्हा लॉटरीचा निकाल जाहीर झाला, तेव्हा माझ्या नावावर पहिले बक्षीस मिळेल, अशी मला मुळीच अपेक्षा नव्हती. बँकेत तिकिट जमा करण्यापूर्वी मी अनेक वेळा निकाल तपासला होता. यानंतर राजन लॉटरीच्या पुरस्कारासाठी सहकारी बँकेत गेला, तेथे अधिकाऱ्यांनी त्याला लॉटरीचे तिकीट कन्नूर जिल्हा बँकेत जमा करण्यास सांगितले. काही दिवसांत संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर लॉटरीची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

पैशांनी चुकवणार कर्ज :
लॉटरीच्या पैशापूर्वी राजनला कर्ज फेडण्याची इच्छा आहे. तो म्हणाला, माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. पहिल्यांदा मी तो हिशेब चुकता करेल. मग कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीन. थोड्या पैशांनी मला गरजूंसाठी काहीतरी करावेसे वाटते. राजन म्हणाला की, घामाचे मूल्य माहित आहे आणि पैसे मिळवणे सोपे नाही हेही त्यांना माहित आहे. म्हणून ते पैसे वाया घालवणार नाहीत.