मी शिवसेनेच्या संपर्कात होतो अन् सेनेचे नेतेही… : एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपवर नाराज एकनाथ खडसेंनी आरोप केला की माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं तिकीट कापलं. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खडसे पक्ष सोडणार या दाव्याला बळ मिळालं. मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेतेही माझ्या संपर्कात होते हे खरं आहे असा दावा भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी केला.

दरम्यान शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला होता की एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. परंतू किती नेते संपर्कात आहेत हे मात्र आज सांगू शकत नाही. परंतु यावर खडसेंनीच स्वत: खुलासा केल्याने गुलाबराव पाटलांच्या दाव्याला बळ मिळले हे नक्की.

एका वृत्तानुसार खडसेंनी बोलताना सांगितले की, मी भाजप सोडू शकतो किंवा जाऊ शकतो असं म्हणलं नव्हतं, मी संन्यासही घेऊ शकतो. पक्षाने माझ्या मागणीची नोंद घेतली याचच मला समाधान आहे. मला न्याय मिळेपर्यंत मी संघर्ष करणार आहे.

खडसे म्हणाले की मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि शिवसेनेचे नेतेही माझ्या संपर्कात होते हे खरं आहे. हा खुलासा खुद्द एकनाथ खडसेंनी केल्याने आता पुढे काय होणार हे येणारा काळच ठरवेल. परंतु राजकीय चर्चांना रंग चढणार हे नक्की.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/