फक्त एका ‘पॉर्न’ मॅगझिननं किम जोंग उन अन् त्यांच्या 3 भावंडांचं केलं वाटोळं, वडिलांनी दिली मोठी शिक्षा

पोलिसनामा ऑनलाइन – मागील महिन्यात जगभरात कोरोना संसर्गापेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती उत्तर कोरियाचा हुकूमशहा असलेला किम जोंग उन याची. जगभरात हुकूमशहाचा मृत्यू झाल्याची अफवा होती. तसंच त्याचा उत्तराधिकारी कोण असेल हे देखील जगाने ठरवून टाकलं होत. तर त्याच्या मृत्यूची कधी आणि कशी घोषणा होणार हे देखील वाऱ्यासारखं पसरलं होत. परंतु, किम जोंग उन नंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आणि सार काही शांत झालं.

दरम्यान, आता हुकूमशहा असलेल्या किम बाबत एक मोठी आणि खासगी गोष्ट समोर आली आहे. किम जोंग उन स्वित्झर्लंडच्या शाळेत शिक्षण घेत होते. परंतु, तेथून त्यांना उत्तर कोरियात परत बोलवण्याच्या बाबतीत मोठा खुलासा झाला आहे. किम जोंग उन परदेशात शिकायला असल्यामुळे त्यांच्यावरती अमेरिकेसारख्या देशाची नजर असणार, हे जाणून किम जोंग उन यांच्या वडिलांनी गुप्तहेर आणि दुरूनच त्यांच्यावरती नजर ठेवणारी माणसे नेमली होती. या गुप्तहेरांना काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यामुळे किम यांना पुन्हा उत्तर कोरियामध्ये परतावे लागले होते.

१९९० च्या दशकामध्ये स्वित्झर्लंडच्या बर्नमधील एका खासगी शाळेत किम जोंग उन शिक्षण घेत होते. त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी काही गुप्तहेर पाठविले होते. या गुप्तहेरांना किमच्या खोलीत पॉर्न मॅगझीन सापडल्याने त्यांनी याबाबतची माहिती किमच्या वडिलांच्या कानावर घातली. लगोलग हुकूमशहा इल यांनी किम जोंग उनला शाळा सोडण्यासाठी सांगितलं आणि मायदेशात परतण्याचे आदेश दिले. त्यावेळी इल हे हुकूमशहा आणि बाप या दोन्ही भूमिकांमध्ये पुरते अडकले होते. त्यांना मुलगा बिघडण्याची काळजी वाटत होती. पाश्चिमात्य देशातील अश्लील गोष्टींमुळे मुलगा वाईट नादाला लागेल याची त्यांना काळजी वाटत असे. इल यांना एकूण चार मुलं होती. त्यांची सर्व माहिती क्षणाक्षणाला इल यांच्यापर्यंत हे गुप्तहेर पोहचवत असत.

इल यांनी आपल्या चारही मुलांची ओळख लपवली होती. त्यांना उत्तर कोरियाच्या परदेशातील अधिकाऱ्यांची मुले म्हणून या शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला होता. मात्र, तेथील शिक्षकांना किम यांच्यावरती एक मोठा संशय होता. किम जोंग उन हे परीक्षेत चांगले मार्क पाडण्यासाठी कॉपी करत असल्याची शंका शिक्षकांना आली होती. त्यामुळे त्यांची खोली तपासण्यात आली. यावेळी किम यांच्या खोलीत काही पॉर्न मॅगझीन सापडली होती. मात्र, हे प्रकरण शाळेपर्यंत न राहता गुप्तहेरांच्या नजरेत आलं आणि किम यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु झाला.

किम यांचे बालपण स्वित्झर्लंडमध्ये गेलं असल्यामुळे त्यांना स्विस बनावटीच्या वस्तूंची प्रचंड आवड होती. त्यांचे तेव्हाचे वर्गमित्र जोयाओ मायकल सांगतात की, आम्ही दोघेजण खूप मस्ती करत असायचो. किम हा खूप चांगला होता. तो नेहमी दुसऱ्या मुलांसोबत देखील चांगलं वागायचा. त्यांना बास्केटबॉलही खूप आवडत होता. असं त्यानं सांगितलं. किम जोंग उन यांना स्विस वस्तू एवढ्या आवडत असतं की, ते उत्तर कोरियातील अधिकाऱ्यांना महागड्या
स्विस घड्याळांसोबत अनेक भेट वस्तू देत असतात.

मात्र, किम यांच्या एका चुकीमुळं त्यांच्या तिनही भावंडांना परदेशातील शिक्षण, मित्र सर्वाना सोडून परत उत्तर कोरियात यावं लागलं.