‘सूर्यातून येतो ॐचा आवाज’, उपराज्यपाल किरण बेदींनी व्हिडीओ शेअर करून केला ‘दावा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाँडिचेरीच्या उपराज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी ट्विटरवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. सूर्यातून ओमचा आवाज ऐकू येतो असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे बेदी सोशलवर ट्रोल झाल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

किरण बेदी यांनी शनिवारी सकाळी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. नासानं सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला होता. याचाच हा व्हिडीओ होता. हा आवाज ओम असा उच्चार केल्यासारखं वाटत असल्याचं बेदींनी म्हटलं. सूर्य ओमचा जप करत असल्याचा दावा किरण बेदींनी केला होता. पाहता पाहता किरण बेदींचं व्हिडओ सोशलवर व्हायरल झालं. हजारो लोकांनी हे ट्विट लाईक करत शेअरही केलं. अनेकांनी यावर कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या.

बेदींच्या या ट्विटनंतर मात्र नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काहींनी मीम्स शेअर करत बेदींवर निशाणा साधला आहे. काहींनी तर असंही म्हटलं आहे की, हा व्हिडीओ फेक आहे. काहींनी बेदींना वैज्ञानिक दृष्टीकोन जपण्याचा सल्लाही दिला आहे. काहींनी तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था नासाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/