Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल परबांनाही तुरूंगात जावे लागणार’ – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या संबंधित मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने Enforcement Directorate (ED) छापेमारी केली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी परब यांच्या वांद्रे (Bandra) येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील (Marine Drive) सरकारी निवासस्थानी दाखल झालेत. तसेच, पुणे आणि रत्नागिरीमधील (Ratnagiri) अनिल परब यांच्या मालकीच्या जागेची पाहणी केली जातेय. परब यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेला (Shivsena) एक धक्का मानला जात आहे. यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) प्रतिक्रिया दिली आहे.

 

”परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे,” असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे. ”बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे.” असं सोमय्या म्हणाले. (Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab)

 

तसेच पुढे सोमय्या म्हणाले, “यशवंत जाधव (Shivsena Leader Yashwant Jadhav) यांच्या दुबई संबंधांची (Dubai Connection)
ईडीने चौकशी केली असून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि अन्य नेत्यांची चौकशी सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरकारमधील गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होईल,” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | bjp leader kirit somaiya ed raid on shivsena leader anil parab premises in mumbai pune ratnagiri ED News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा