Knee Pain | गुडघ्याचे दुखणे वाढले आहे का? उठणे-बसणे सुद्धा झालेय अवघड? 5 सोपे उपाय करा फॉलो, काही दिवसातच मिळेल आराम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Knee Pain | जगभरात मोठ्या संख्येने लोक गुडघेदुखी (knee Pain) ने त्रस्त आहेत. पूर्वीच्या काळी ही समस्या वाढत्या वयाच्या लक्षणांमध्ये येत असे, पण सध्या तरूणांना सुद्धा हा त्रास होत आहे. या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती करू शकता. ते जाणून घेऊया.

गुडघेदुखीपासून मुक्त होण्याचे सोपे उपाय –

हळद :

हळद तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तिच्यातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म गुडघेदुखीपासून आराम देतात. एक चमचा हळद पाण्यात टाकून पेस्ट बनवा आणि गुडघ्यांवर लावा. यामुळे लवकर आराम मिळेल. ही पेस्ट दिवसातून दोनदा लावू शकता. (Knee Pain)

आले :

आले सांधेदुखी किंवा सूज पासून आराम देते. आल्याचे छोटे तुकडे करून ते गरम पाण्यात टाका. आता पाणी गाळून त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे पाणी नियमित प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

मोहरीचे तेल :

लसणाच्या एका पाकळीचे कापून बारीक बारीक तुकडे करा. ते २ चमचे मोहरीच्या तेलात गरम करा. थोडे गरम झाल्यावर हात गोलाकार गतीने फिरवून गुडघ्यांना चांगला मसाज करा.

कोरफड :

गुडघ्यांची सूजही कमी करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये थोडी हळद पावडर मिसळा. यानंतर, प्रभावित भागावर लावा. यामुळे वेदना आणि सूज कमी होईल.

कापूर तेल :

एक चमचा कापूर तेलात एक चमचा खोबरेल तेल मिसळा. दोन्ही चांगले गरम करा. तेल थंड झाल्यावर त्याने गुडघ्यांना दिवसातून दोनदा मसाज करा. गुडघेदुखी दूर होईल.

एप्सम सॉल्ट :

एप्सम सॉल्ट गुडघेदुखीवर प्रभावी आहे. आंघोळीच्या पाण्यात एप्सम सॉल्ट मिसळा. या पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. तसेच, पाण्यात पेपरमिंट ऑईल आणि लोबान ऑईल टाकू शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 3 सराईत गुन्हेगार तडीपार

बनावट कागदपत्रांच्या आधारे सारस्वत बँकेची 27 लाखांची फसवणूक, बिल्डरसह चार जणांविरुद्ध FIR, एकाला अटक

सुरक्षारक्षकांना मारहाण करुन किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, 7 ते 8 जणांवर FIR

ACB Trap News | 95 हजारांची लाच घेताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक,
शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज; नेटेट टॉपने वेधले सर्वांचे लक्ष

विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA