‘ही’ 8 लक्षणे दिसली तर समजून जा तुम्ही आहात ‘कम्पुटर व्हिजन सिंड्रोम’चे शिकार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अति प्रमाणात कम्प्युटरवर काम केल्याने अनेक शारीरीक समस्या उद्भवतात. सध्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होममुळे तर कम्पुटरचा वापर खुपच वाढला आहे. एरव्ही ऑफिमध्येही अनेकजण दिवसभर कम्प्युटरवर काम करत असतात. सतत कम्युटरवर एकाग्र होऊन नजर न हलवता काम केल्याने कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची समस्या होऊ शकते.

ही आहेत लक्षणे

1 कधी-कधी डोळ्यांची जळजळ होणे.

2 अचानक धुसर दिसणे

3 थकवा येणे

4 खांदे दुखणे

5 डोळ्यांच्या आत खाज येणे

6 डोकेदुखी होणे

7 पाठदुखी होण

8 कंबरदुखीचा त्रास

ही आहेत कारण

1 पीसी काम करताना स्क्रीनवर तुमचा फोकस असतो. वेगवेगळे शब्द वाचत असता. त्यांचा नकळतपणे तुमच्या डोळ्यांवर परीणाम होत असतो.

2 डोळ्यांच्या मासंपेशींवर नकारात्मक परिणान घडून येत असतो.

3 स्क्रीनमुळे डोळ्यांवर येणारा उजेड दबाव निर्माण करत असतो.

अशी घ्या काळजी

1 कॉम्प्युटरच्या स्क्रीनला स्वतःपासून 20 ते 26 इंचांपर्यंत दूर ठेवा.

2 स्क्रिनचा ब्राइटनेस अडजस्ट करा.

3 कोणत्याही लाईट्सचे रिफ्लेक्शन स्क्रीनवर येऊ देऊ नका.

4 पापण्यांची अधून-मधून हालचाल करा.

5 स्क्रीनकडे बराचवेळ एकटक पाहू नका.

6 मध्येच पाच मिनिटे वेळ काढून शरीराची हालचाल करा.