‘सॅनिटायझर’ लावलेल्या हातांनी अन्न सेवन करणं सेफ की धोकादायक ? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना ठाऊक आहे की केवळ स्वच्छतेनेच याचा पराभव होऊ शकतो. म्हणूनच, अलिकडच्या काळात सॅनिटायझरच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घेतल्याशिवाय लोक त्याचा अंदाधुंद वापर करीत आहेत. लोकांना सॅनिटायझर वापरण्याची योग्य पद्धत काय आहे हे देखील माहित नाही. या लेखाच्या माध्यमातून आज आपण सॅनिटायझर बद्दल योग्य माहिती जाणून घेऊया.

तुम्हाला माहिती आहे का की बाजारात उपलब्ध सर्व सॅनिटायझर हे प्रभावी नाहीत? तर अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की सॅनिटायझर खरेदी करण्यापूर्वी काय लक्षात ठेवले पाहिजे? इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे माजी सचिव, संसर्ग तज्ज्ञ आणि दिल्ली वैद्यकीय परिषदेच्या वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र सैनी म्हणतात की लोकांना सध्या हे माहित नाही की सॅनिटायझर वापर करणे किंवा खरेदी करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या खऱ्या गाइडलाइन काय आहेत?

डॉ. सैनी यांच्या म्हणण्यानुसार साबण आणि पाण्याने हात धुणे हे सर्वात उत्तम आहे. आपल्या सभोवताल शुद्ध पाणी असल्यास सॅनिटायझर वापरुन आपले हात स्वच्छ करण्यापेक्षा शुद्ध पाण्याने धुणे कधीही चांगले ठरेल. केवळ जेव्हा असे करणे शक्य नसेल तेव्हा सॅनिटायझर वापरा. बहुतेक लोक त्यांच्या हातात सॅनिटायझर घेतात आणि ते 2-3 सेकंद चोळतात आणि समजतात की हात स्वच्छ झाले. तर हा विचार करणे योग्य नाही. सॅनिटायझरच्या सहाय्याने कमीतकमी 10-12 सेकंदांसाठी आपल्या हातांना चोळावे. सॅनिटायझरने आपल्या हातांना चांगले स्वच्छ करावे तेव्हा कुठे ते विषाणू काढून टाकण्यास प्रभावी ठरू शकते. जसे की डब्ल्यूएचओची मार्गदर्शकतत्त्वे देखील हेच सांगतात की हातांच्या तळव्यांना चांगले एकत्र चोळावे. दोन्ही हातांची बोटे चांगली एकत्र चोळावी. अंगठ्याला चांगल्या पद्धतीने हळू हळू चोळण्यास विसरू नये.

डॉ सैनी म्हणाले की सॅनिटायझर खरेदी करताना हे लक्षात घ्या की त्यामध्ये 60-70 टक्के अल्कोहोलची मात्रा असावी. ते देखील इथिल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल असले पाहिजे. यापेक्षा अधिक मात्रा देखील ठीक नाही. सॅनिटायझर लावलेल्या हातांनी खाणे धोकादायक ठरू शकते. कारण त्यात मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असते, जे आपल्या मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर परिणाम करू शकते. सॅनिटायझर लावल्यानंतर 20 सेकंदानंतरच खाणे सुरू करा. इतक्या वेळेत ते उडून जाते.

सॅनिटायझर किती काळ प्रभावी असू शकतो?

या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. सैनी म्हणाले की, सॅनिटायझर लावण्यापर्यंत. म्हणजेच जेव्हा आपण सॅनिटायझरने हात स्वच्छ करता तेव्हा विषाणू नष्ट होतात. वापरानंतर 20 सेकंदांनंतर जर आपण पुन्हा एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर आपल्याला पुन्हा हात स्वच्छ करावे लागतील. त्यांनी सांगितले की पुन्हा पुन्हा सॅनिटायझर वापरणेही चांगले नाही. म्हणून शक्य तितक्या प्रमाणात हात धुण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मद्यपान करणार्‍यांना कोरोनाचा त्रास कमी असतो का?

या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. सैनी म्हणाले की असे मुळीच होत नाही. कारण जेव्हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो नलिकेच्या आत बसून राहत नाही. तो पेशीच्या आत शिरतो. दुसरे म्हणजे, प्यायल्या जाणाऱ्या अल्कोहोलमध्ये त्याची मात्रा विषाणू दूर करण्याच्या दृष्टीने खूपच कमी आहे. कारण जर तुमच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त असेल तर हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होऊ शकते. म्हणूनच लोकांमध्ये दारू संबंधित एक मोठा गैरसमज आहे.

सॅनिटायझर वापरताना या दहा गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे

1. सॅनिटायझर वापर स्वच्छ दिसणार्‍या हातांमध्येच करावा.

2. सॅनिटायझरमध्ये 60-70 टक्के इथिल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल असणे आवश्यक आहे.

3. हात स्वच्छ करताना डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवा.

4. 15-20 सेकंदांपर्यंत हात चोळा, ते सर्व भागापर्यंत पोहोचले पाहिजे.

5. हॅन्ड सॅनिटायझरला प्राथमिकता अजिबात देऊ नका.

6. स्वच्छ पाण्याने हात धुल्यानंतर सॅनिटायझर वापरू नका.

7. सॅनिटायझरच्या प्रमाणाची काळजी घ्या.

8. तोंडावर सॅनिटायझर वापरू नका.

9. ज्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था नाही तेथेच सॅनिटायझर वापरा.

10. साबण आणि पाण्याने हात धुणे अधिक प्रभावी आहे, म्हणून केवळ गरजेनुसार सॅनिटायझर वापरा.