‘हिमोग्लोबिन’ वाढविण्यासाठी ’हे’ 7 ‘नैसर्गिक उपाय’ फायदेशीर ! जाणून घ्या 4 ‘दुष्परिणाम’

पोलीसनामा ऑनलाइन –  शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले तर आरोग्य चांगले राहते. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा होतो. रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने असा हिमोग्लोबिनचा अर्थ आहे. ते कमी झाले म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण 17 ते 22 असू शकते, लहान मुलांमध्ये ते 11 ते 13 आणि प्रौढ वयातील महिलांमध्ये 12 ते 16 तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 14 ते 18 असणे गरजेचे आहे.

कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम

1 हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो
2 लाल रक्तपेशी कमी होतात
3 रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
4 आजारपण येण्याची शक्यता वाढते.

हे पदार्थ आहारात घ्या

1 टोमॅटो
टोमॅटोमध्ये भरपूर लोह, व्हिटॅमिन सी असतो. याच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून 0.8 मिलीग्रॅम लोह मिळते.

2 मध
दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घ्या. मधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. भरपूर ऊर्जा मिळते.

3 डाळिंब
डाळिंबामध्ये भरपूर लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे शरीराला शक्ती मिळते.

4 सुकामेवा
मूठभर सुकामेवा नियमित खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढते. अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीकमधून लोह मिळते.

5 सफरचंद
यात लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने हिमोग्लोबिन जलद वाढते.

6 पालक
पालकात लोह भरपूर असते. हे नियमित खाल्ल्याने हिमोग्लोबिन नक्कीच वाढते.

7 बीट
यातील फोलेटमुळे हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करताता. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी बीटमध्ये असतात.