Gold & Sliver Rates : 238 रूपयांनी महाग झालं सोनं, जाणून घ्या चांदीचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आज पुन्हा देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे भाव वाढले. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव २३८ रुपयांनी वाढून ५६,१२२ रुपये प्रति १० ग्राम झाला. तर चांदी ९६० रुपयांनी वाढून ७६,५२० रुपये प्रति किलो झाली.

या संदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, ‘रुपयामध्ये वाढ झाल्याने सोमवारी सोन्याच्या किंमती मर्यादित राहिल्या.’

रुपया तीन पैशाने वाढला

देशांतर्गत बाजारातील सकारात्मक घडामोडीमुळे इंटर बँक परकीय चलन बाजारात सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया तीन पैशांनी वाढून ७४.९० रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. इंटर बँक परकीय चलन बाजारात व्यापार सुरू झाल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपया ७४.९६ रुपये प्रति डॉलरवर कमजोर झाला आणि लवकरच सुधार होऊन बळकट झाला. अखेर तो मागील दिवसाच्या बंद दराच्या तुलनेत तीन पैशांनी वाढून ७४.९० रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. यापूर्वी शुक्रवारी डॉलर-रुपयाचा विनिमय दर प्रति डॉलर ७४.९३ रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस २,०३५ डॉलरने किरकोळ वाढला, तर चांदी २८.३१ अमेरिकन डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती.

मागील सत्रात इतका होता भाव

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत सर्वात उच्चांकी पातळीवर गेली होती. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५७,००८ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. मात्र शुक्रवारी त्यात किरकोळ सहा रुपयांनी वाढ झाली. यासह चांदीची किंमतही नोंदवली गेली होती. शुक्रवारी चांदीच्या भावात ५७६ रुपयांची वाढ झाली. यासह दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव ७७,८४० रुपये प्रतिकिलो सर्वात उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस २०६१ डॉलर आणि चांदीचा भाव प्रति औंस २८.३६ डॉलरवर ट्रेंड करत होता.