जगातील सर्वात मोठया पेन्शन फंडानं ‘एप्रिल-जून 2020’ तिमाहीमध्ये गमावले 12 लाख कोटी रूपये, जाणून घ्या कारण

टोकियो : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला दुहेरी मार बसत आहे. एकीकडे दररोज कोविड-19च्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर, आर्थिक व्यवहार थंडावल्याने जागतिक अर्थव्यवस्था सुद्धा डळमळीत झाली आहे. यादरम्यान जगातील सर्वात मोठ्या पेन्शन फंडमध्ये विक्रमी नुकसान नोंदले गेले आहे. जपानच्या सरकारी पेन्शन इन्व्हेस्टमेंट फंडचे 11 टक्के नुकसान झाले आहे. जपान सरकारनुसार, एप्रिल-जून 2020 तिमाहीत पेन्शन फंडला 12.32 लाख कोटी रूपये (164.7 अरब डॉलर) चा तोटा झाला आहे. यामुळे फंडची एकुण असेट घटून सुमारे 150 खरब येन राहिली आहे.

ओव्हरसीज डेटला प्राधान्य

जपानच्या पेन्शन फंडमध्ये सहभागी फॉरेन स्टॉकची कामगिरी सर्वात खराब झाली. तर, स्थानिक इक्विटीजची कामगिरीसुद्धा खराब होती. नुकताच फंडच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये बदल करण्यात आला होता. सोबतच असेट अलोकेशनमध्ये सुद्धा दुरूस्ती करून ओव्हरसीज डेट (र्जींशीीशरी ऊशलीं) मध्ये गुंतवणुकीवर भर देण्यात आला. आर्थिक वर्षाचा फायदा हा तोट्यात बदलल्याने जपानमध्ये राजकीय वातावरण गरम होऊ शकते. जपानमध्ये लोखो सेवानिवृत्त नागरिकांचा सोशल सुरक्षितता मोठा मुद्दा आहे.

केवळ ओव्हरसीज बॉन्डसनेच दिला पॉझिटिव्ह रिटर्न

जीपीआयएफचे अध्यक्ष मस्ताका मियाजो यांनी म्हटले की, स्थानिक आणि परदेशी इक्विटीजच्या घसरणीमुळे आर्थिक वर्षात फंडचा रिटर्न निगेटीव्ह झाला आहे. परंतु, यापूर्वी दोन्ही इक्विटीजने अमेरिका-चीन ट्रेडवॉरनंतर सुद्धा 2019 मध्ये चांगली कामगिरी केली होती. कोरोना व्हायरसमुळे गुंतवणुकदारांनी जोखिम न घेता इक्विटीजमध्ये गुंतवणूकीपासून दूर जाणे पसंत केले. या दरम्यान ओव्हरसीज बॉन्डसनेच पॉझिटीव्ह रिटर्न दिला आहे. सिक्युरिटीजमध्ये 0.5 टक्के फायदा झाला आहे. तर स्थानिक बॉन्डसमध्ये 0.5 टक्के नुकसान झाले आहे.

अगोदरच होती जीपीआयएफमध्ये नुकसानीची शंका

मियाजो यांनी सांगितले की, तिमाही दरम्यान लोकल इक्विटीजमध्ये 18 टक्के आणि फॉरेन स्टॉक्समध्ये 22 टक्के नुकसान नोंदली गेली. जीपीआयएफने एप्रिल 2020 च्या दरम्यान फॉरेन बॉन्ड्समध्ये विनियोजन 10 टक्के वाढवून 25 टक्के केले होते. तर फॉरेन आणि डोमेस्टिक स्टॉक्सच्या विनियोजनात परिवर्तन न करता 25 टक्केच्या स्तरावर कायम ठेवले होते. शिंकिन असेट मॅनेजमेंट कंपनीचे चीफ फंड मॅनेजर नावकी फुजीवारा यांनी म्हटले की, त्यांना नुकसानीची शंका अगोदरपासून होती.