TB होण्याचा जास्त धोका कोणाला असतो ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी लाखो लोक टीबी सारख्या गंभीर आजाराला बळी पडतात. टीबीचे बॅक्टेरिया हे लंग्सवर परिणाम करतात. यामुळं ग्रस्त व्यक्तीला श्वसनासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुख्य म्हणजे टीबीचा बॅक्टेरिया सहज समोरील व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतो. सर्दी खोकल्याप्रमाणेच हे बॅक्टेरिया निरोगी व्यक्तीला इंफेक्ट करतात. टीबी हा आजार कुणाकुणाला जास्त प्रभावित करतो हे आपण आज जाणून घेणार आहोत.

सर्वात जास्त धोका कुणाला ?

1) टीबीचे बॅक्टेरिया एकाएकी कुणालाही इंफेक्ट करत नाहीत. जेव्हा एखादी निरोगी व्यक्ती टीबीनं ग्रस्त व्यक्तीच्या जास्त सानिध्यात राहते तेव्हा टीबीचे बॅक्टेरिया शरीरावर अटॅक करतात. म्हणून जेव्हा कुटुंबातील लोक, मित्र किंवा ऑफिसमधील कलीग जेव्हा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात जास्त येतात तेव्हा त्यांनाही याचं इफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.

2) लहान मुलेदेखील टीबीच्या जाळ्यात अडकण्याचा धोका जास्त असतो. याचं कारण म्हणजे लहान मुलांचं इम्युन सिस्टीम हे मोठ्यांप्रमाणे जास्त मजबूत नसतं. टीबीचे बॅक्टेरिया त्यांना सहज इंफेक्ट करतात.

3) टीबीचे जास्त रुग्ण असणाऱ्या भागात प्रवास जास्त केल्यानं किंवा तिथं वारंवार भेट दिल्यानं तुम्हाला टीबीच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो.

4) मेडिकल क्षेत्रात जी लोकं काम करताना त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. कारण टीबीनं प्रभावित रुग्णांच्या उपचारासाठी त्यांच्या आजूबाजूला त्यांना रहावं लागतं. इथं थोडंही दुर्लक्ष करणं महाग पडतं. कारण टीबीचे बॅक्टेरिया लगेच त्यांना इंफेक्ट करतात.

5) जे लोक एचआयव्हीनं पीडित असतात त्यांना टीबीचे बॅक्टेरिया सहज इंफेक्ट करतात. कारण अशा व्यक्तींचं इम्युन सिस्टीम आधीच कमजोर झालेलं असतं. आजारांशी लढण्यासाठी त्यांना खूप अडचण येते. त्यामुळं असे लोक लवकर टीबीचे शिकार होतात.

6) ज्या व्यक्ती कुपोषणाच्या शिकार आहेत त्यांनाही टीबी होण्याचा धोका जास्त असतो. कारण शरीराला पूर्ण पोषण मिळत नसल्यानं त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

7) मद्यपान किंवा धूम्रपान जास्त प्रमाणात केल्यानंही टीबी होण्याचा धोका जास्त धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार सिगारेट किंवा मद्यसेवन करणाऱ्या लोकांना टीबी होण्याचा धोका जास्त असतो.