Homeताज्या बातम्याओवेसींनी परत मागितली 'मशिद', कोयना मित्रा म्हणाली - 'आमची 40000 मंदिरं परत...

ओवेसींनी परत मागितली ‘मशिद’, कोयना मित्रा म्हणाली – ‘आमची 40000 मंदिरं परत करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 मध्ये हजेरी लावलेल्या अभिनेत्री कोयना मित्राने सोशल मीडियावर अनेकदा वादग्रस्त राजकीय वक्तव्य केली आहेत. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिने  पुन्हा एकदा ट्विट करुन एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले आहे. ओवेसी यांनी  एक लेख शेअर करताना  वादग्रस्त ट्विट केले होते की, ‘मला माझी मशिद परत पाहिजे आहे.’ ओवेसीचे ट्विट शेअर करताना कोयनाने लिहिले की ‘मलाही आमची 40 हजार मंदिरे परत हवी आहेत.’ #IdiotOwaisi

राम जन्मभूमी वादावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत ओवेसी यांनी ट्विट केले होते. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये रामलला विराजमान यांना वादग्रस्त जागेचा खरा मालक म्हणून मान्यता दिली आहे. त्याचबरोबर मशिदीसाठी 5 एकर जमीन स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, ओवेसी या निर्णयावर अजिबात खूष नाहीत आणि तो या निर्णयाविरोधात सतत निषेध दर्शवत आहेत.

बिग बॉसमधून कोयना बाहेर –

कोयना बिग बॉसमधून बाहेर पडली आहे. कोयना मित्राच्या खेळाला लोकांची चांगलीच पसंती होती.  बिग बॉसमधून कोयना बाहेर पडल्यानंतर तिच्या चाहत्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती.

ट्विटरवर लोक म्हणाले की, सलमान खान कोयना मित्राला  जबरदस्तीने चुकीचे ठरवत होता कारण ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर  सत्य बोलते.  बिग बॉसच्या घरात कोयना मित्र आणि शहनाज गिल प्रत्येकजण आपसात भांडताना दिसले आहेत पण सलमानने कोयनाचे नाव जाहीर करताच या दोघांनीही एकमेकांना विसरून एकमेकांना मिठी मारली होती. शहनाझनेही कोयनाकडे माफी मागितली.  कोयनाने  रश्मीचा घराबाहेर पडताना निरोप घेतला नव्हता.

Visit : Policenama.com 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News