IND vs WI : बॉलर्सनीं कॅप्टन कोहलीची डोकेदुखी वाढवली, ‘रोहित की राहणे’ होणाला निवडणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत मिळवलेल्या धडाकेबाज विजयानंतर आता भारतीय संघ विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला असून उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यांत संघात कुणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर पडला आहे. पाच विशेष गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता असलेल्या भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची या यक्षप्रश्न पडला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्यापासून सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे.

या सामन्यांत भारतीय संघ चार गोलंदाजांसह उतरला तर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघानांही या सामन्यात संधी मिळेल. मात्र असे झाले नाही तर दोघांपैकी एकाला या सामन्यात बाहेर बसावे लागेल. त्यामुळे उत्तम फॉर्मात असलेल्या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची हा प्रश्न पडल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघ दीर्घकाळानंतर कसोटी सामने खेळणार असून रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासाठी संघनिवड मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सलामीला विराट कोहलीकडे अनेक पर्याय असून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोघे सलामीला खेळणार असल्याची माहिती मिळत आहे.

चबरोबर हनुमा विहारी हा देखील एक पर्याय कोहलीकडे असून त्याच्याकडे ऑस्ट्रेलियात सलामीला खेळण्याचा अनुभव देखील आहे. त्याचबरोबर पुजाराआणि कर्णधार कोहली हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर नक्की असून जर यष्टीरक्षक रिषभ पंत याला सहाव्या क्रमांकावर आणि रवींद्र जडेजा याला सातव्या क्रमांकावर संधी दिली तर कोहलीकडे पाचव्या क्रमांकासाठी रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांमधील एकच पर्याय राहत असून हा निर्णय अवघड असणार आहे.

नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्मा याने शानदार खेळी करत अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे तो या क्रमांकाचा प्रथम दावेदार असून अजिंक्य रहाणेसाठी लढाई अवघड असणार आहे. त्याचबरोबर कर्णधार कोहली केवळ एकच फिरकी गोलंदाज संघात खेळवणार असल्याने कुलदीप यादव याची जागा नक्की असल्याचे सांगितले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like