सांगली तिहेरी हत्याकांडानं हदरली ! मुलाकडून आई-वडिलांसह बहिणीची हत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे मुलानेच आपल्या आई-वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून ही हत्या घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोटच्या मुलानेच आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची हत्या केल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय ८२), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय ७५), आणि समुद्राबाई बिरादार (वय ६२) अशी मृतांची नावे आहे.

मुलानेच आपल्या वृद्ध आईवडिलांची आणि बहिणीची हत्या केल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. या घटनेचे वृत्त ऐकून सारेच सून्न झाले आहेत. संशयित सिद्धप्पा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय ५८) असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आज सकाळी हा तिहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकरी आणि नातेवाईकही दाखल झाले. घटनास्थळी उमदी तसेच जत पोलीस दाखल झाले असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.