कोपरगाव : कोळपेवाडी बलात्कार प्रकरणातील आरोपीचे फोटो पोलिसांकडून जारी

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील चौथीतील मुलीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने फरार आरोपीचा शोध घेत असून आज पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला सुरेगाव येथील कालव्याजवळ सोडून दिले. मुलगी मोतीनगर येतील नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

कोळपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. या आरोपीचे फोटो पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले असून त्याची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आरोपीचे नाव अमोल अशोक निमसे (रा. शिरपूर ता. पाथर्डी, जि. नगर) असून सध्या तो फरार आहे. हा आरोपी दिसून आल्यास पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी त्यासाठी फोन नंबर दिले आहेत. पोलीस निरीक्षक दिलीप पवार – 9823266233, सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील – 9922000885, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख – 9890741692, पोलीस उप निरीक्षक गणेश इंगळे – 8805148478 तसेच नगर स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/