इंस्टाग्राम स्टोरी शेअर करुन अभिनेत्री कृती खरबंदाने सांगितले – ‘मी मलेरियाने ग्रस्त’

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदाने आपण मलेरियाने ग्रस्त असल्याची माहिती दिली आहे. तिने सांगितले की आता तिची तब्येत सुधारत आहे. या 29 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक सेल्फी पोस्ट करत म्हटले की, आता तिची तब्येत सुधारत आहे आणि लवकरच पुन्हा काम सुरू होण्याची आशा आहे.

कृती खरबंदाने सेल्फीसह लिहिले आहे- ’हॅलो! हा माझा मलेरियावाला चेहरा आहे. हा आजार जास्त काळ टिकणार नाही. मी लवकरच ठीक होईन, कारण मला पुन्हा कामावर जावं लागेल.’

ती म्हणते, ‘ज्यांना माझी काळजी आहे, त्यांना मी सांगू इच्छिते की माझी प्रकृती सुधारत आहे आणि मला आशा आहे उद्या आणखी सुधारणा होईल. 2020 ने मला संयम बाळगणे आणि स्वतःवर प्रेम करण्यास शिकवले आहे.

कृती खरबंदा नुकतीच विजय नाम्बियारच्या ‘तैश’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात पुलकित सम्राट, जिम सर्भ, हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख यांनीही भूमिका साकारल्या आहेत. 29 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर रिलीज झाला होता. कृती खरबंदा सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते, यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत असतात. यावेळी त्याने आश्चर्यकारक पोल डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. कृती खरबंदाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तो आतापर्यंत 15 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

अभिनेता पुलकित सम्राटने आपल्या सह-कलाकार आणि चाहत्यांना तैश बस्टर चॅलेंज दिले होते, ज्याचा स्वीकार करताना कृती खरबंदाने हा व्हिडिओ सामायिक केला. यावर एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले आहे की, ’तू टॅलेंटेड आहेस.’ त्याच वेळी, गायिका आणि अभिनेत्री सोफी चौधरीने लिहिले आहे, ’खूपच सुंदर.’ चाहते कृतीच्या पोल डान्सचे कौतुक करत आहेत. कृतीने ‘तैश’ चित्रपटात पुलकित सम्राटसोबत काम केले आहे.