‘कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकार महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले, डरपोक सरकारचा मोठा पराभव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून योग्यवेळी धार्मिक स्थळ उघडण्यासाठी परवानी देऊ असे सरकारकडून सांगण्यात येत होते. अखेर राज्य सरकारने पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी जाहीर केले. त्यानंतरही, भाजपा नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे खुली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, पण त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यास सुरुवात केलीय. भाजपा आमदार राम कदम (ram-kadam)यांनी ट्विट करुन अखेर सरकार जागे झाल्याचे म्हटले आहे. तसेच, जनतेचा हा मोठा विजय आहे. कुंभकरण निर्द्रावस्थेत असलेल सरकार अखेर जाग (kumbhakaran-sleep-cowardly-government-finally-wakes-temples-open) झाले आहे. डरपोक सरकारचा हा मोठा पराभव आहे, असा टोलाही कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

दरम्यान, भाजपा नेत्यांकडून मंदिरं खुली करण्याची घोषणा केल्यानंतरही सरकारवर टीका करण्यात येत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सरकारलं उशीरा सूचलेलं शहाणपण असल्याचं म्हटल आहे. तर, आचार्य तुषार भोसले यांनीही ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला असे म्हणत हिंदुत्वाचा मोठा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तुषार भोसले यांनी मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन केले होते.