कुपवाडमध्ये कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला

कुपवाड : पोलीसनामा ऑनलाईन

कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे या कंपनीत चोरी करण्याची चोरट्यांची ही पाचवी वेळ आहे. हा प्रकार क्वालिटी पॉवर कंपनीत मंगळवारी (दि.११) मध्यरात्री घडला. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला खोलीत डांबून ठेवून घटनास्थळावरुन पळून गेले. आज (दि.१२) सकाळी सातच्या सुमारास सुरक्षा रक्षकाने आरडा ओरडा केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9703df0c-b667-11e8-b997-9b59523f066f’]

दाजी नाना गोरे (वय-४५,रा.अहिल्यानगर, कुपवाड) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर मिरज येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

याबाबत कंपनीचे मालक व एच.आर.प्रमोद माने यांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.11) कंपनीला सुट्टी असल्याने कंपनी बंद होती. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रखवालदार दाजी गोरे हा कंपनीच्या आतील दक्षिण बाजूस हातात बॅटरी घेऊन फिरत असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने पाठीमागून येऊन गोरेच्या मानेला हात घालून त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. चोरट्याने तीक्ष्ण हत्याराने गोरेच्या डोळ्याजवळ, गळ्यावर, छातीवर गंभीर स्वरूपाचे वार करून जखमी केले. त्यानंतर जखमीला ओढत नेऊन कामगारांच्या खोलीत नेऊन पुन्हा त्याचेवर वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात खोलीत डांबून चोरट्याने दाराला बाहेरून कडी लावून जाताना जखमी गोरेने आरडाओरड करताना पुन्हा चोरट्याने दरवाजा उघडून खोलीत जाऊन तू गप्प बस दंगा केल्यास तुला जीवंत ठेवणार नाही. अशी धमकी देऊन पलायन केले. जखमी गोरे हा रक्ताच्या विवळत पडलेला होता.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bec2035-b667-11e8-8afa-eb34b25de5a3′]

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेजारील कंपनीतील एका रखवालदाराने जखमी गोरेला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मोबाईल उचलत नसल्यामुळे त्याला शोधण्यासाठी कंपनीच्या आवारात येऊन शोधाशोध केली असता. गोरे कामगारांच्या खोलीत जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्याने तात्काळ कंपनीचे एच.आर.प्रमोद माने व सिक्युरीटीच्या प्रमुखांना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी गोरेला मिरजेतील सिव्हील हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करून त्याठिकाणी चार टाके घातले असल्याची माहिती प्रमोद माने यांनी दिली. घटनास्थळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पोलिस फौजफाट्यासह कंपनीला भेट देऊन चोरीच्या घटनेची माहिती घेतली आहे.

एनसी मॅटरमध्ये 3 हजाराची लाच घेणार्‍या पोलिस हवालदारला अटक