शहनाज गिलच्या ‘कुर्ता पजामा’ गाण्याबद्दल बोलताना ‘हा’ अभिनेता म्हणाला – ‘कसलं बकवास गाणंय’ ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक आणि अभिनेत्री शहनाज गिल हिचं कुर्ता पजामा हे गाणं सध्या सोशलवर खूप चर्चेत आहे. या व्हिडीओनं अद्याप कोट्यावधी व्ह्युज मिळवले आहेत. या गाण्याची चांगलीच क्रेज दिसत आहे. असं असताना बिग बॉस 13 चा विनर सिद्धार्थ शुक्ला यानं मात्र या गाण्याबद्दल चकित करणारी कमेंट केली आहे. हे कसलं बकवास गाणं आहे असं त्यानं म्हटलं आहे. सध्या त्याच्या या कमेंटची खूप चर्चा होत आहे.

सिद्धार्थनं या गाण्याबद्दल एक ट्विट केलं आहे. खरं तर त्यानं या गाण्यावर टीका केलेली नसून उलट स्तुती केली आहे. परंतु वेगळ्या स्टाईलमध्ये. सिद्धार्थ म्हणतो, “कुर्ता पजामा काला काला काला काला कसलं बकवास गाणं आहे ओठांवर खेळतंय सारखचं साला साला साला साला.” सिद्धार्थचं हे ट्विट तुफान व्हायरल झालं आहे.

कुर्ता पजामा या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर या गाण्याची निर्मिती टोनी कक्करनं केली आहे. विशेष म्हणजे त्यानंच हे गाणं गायलं आहे. हे गाणं रिलीज होऊन दोनच दिवस झाले आहेत. काही तासातच व्हिडीओला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.