KYC Update | केवायसी अपडेट पडले महागात; पोलिसांनी दोन तासात परत केले 1 लाख 60 हजार रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – KYC Update | गेल्या काही दिवसापासून केवायसी अपडेटच्या (KYC Update) नावाखाली फसवणूक (Cheating) होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मालाडमध्येही अशीच एक घटनासमोर आली आहे. सायबर ठगाने केवायसी अपडेटच्या (KYC Update) नावाखाली लिंक पाठवून महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारला. मात्र मालाड पोलिसांनी (Malad Police) वेळीच तपास करून एका ई-वॉलेटमध्ये (E-wallet) जमा झालेले 1 लाख 60 हजार रुपये वेळीच परत मिळवले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फसवणुकीसाठी सायबर चोरटे (Cyber thieves) नवनवीन क्लुप्त्या लढवत असतात. सध्या मोबाईल केवायसी अपडेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना मालाड परिसरात घडली आहे. एक महिलेच्या मोबाईलवर एक मेसेज आला. हा मेसेज वाचत असतानाच महिलेच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. त्याने केवायसी न केल्यास तुमचा मोबाईल नंबर कायमचा बंद (Mobile number permanently closed) होईल अशा भूलथापा मारल्या.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्यानंतर त्याने महिलेच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्यावरील माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवून तिला क्विक सपोर्ट अँप (Quick Support App) डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने ते अँप डाऊनलोड केले. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला 10 रुपये पाठवले. त्यानंतर त्याने महिलेच्या बँक खात्यातून 1 लाख 60 हजार रुपये काढले. खात्यातून पैसे गेल्याचे उघड झाल्यावर महिलेने मालाड पोलीस ठाण्यात (Malad Police Station) धाव घेतली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे (Senior Police Inspector Dhananjay Ligade) यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर लिगाडे यांच्या मर्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक तांबे,
अशोक कांडे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
त्यावेळी हे पैसे एका इ वॉलेटमध्ये जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी वेळीच संपर्क करून त्या ई-वॉलेटमधील पैसे फ्रिज केले.
फ्रिज केल्यानंतर ते पैसे महिलेला परत केले.

Web Title :- kyc update 1 lakh 60 thousand rupees saved by the malad police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)