सिंगापूरमध्ये जनावरांना न मारता लोक खाणार लॅबमध्ये बनवलेले मांस; जाणून घ्या कसे होईल तयार

सिंगापुर : वृत्तसंस्था –  विचार करा एखाद्या जनावराला न मारता तुम्ही मांस खाण्याची मजा घेऊ शकता का! सिंगापुर काहीसे असेच करणार आहे. सिंगापुर पहिला असा देश बनला आहे, ज्याने लॅबमध्ये तयार झालेले मांस विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. सिंगापूरचे हे पाऊल ऐतिहासिक असल्याचे म्हटले गेले आहे.

अमेरिकन कंपनी ’जस्ट ईट’ चिकन बाइट्सचे उत्पादन करेल आणि त्यांनी सिंगापुरची फूड एजन्सीची सेफ्टी टेस्टसुद्धा पास केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, सिंगापूरमध्ये मंजुरी मिळण्यासोबतच भविष्यासाठी एक असे पाऊल उचलले आहे, ज्यामध्ये जनावरांची हत्या न करता मांस उत्पादन होईल. कंपनीचे म्हणणे आहे की, लॅबमध्ये बनवण्यात आलेल्या मांसात पारंपरिक मांसासारखीच पोषकतत्त्वं असतील आणि स्वादसुद्धा तोच असेल.

अनेक डझन फर्म कल्टीवेटेड चिकन, बीफ आणि पोर्क तयार करत आहेत, जेणेकरून जनावरांच्या हत्येने जलवायू आणि पर्यावरणावर होत असलेला दुष्परिणाम रोखता येईल. यासोबतच कंपनीला कोणत्याही हिंसेशिवाय सुरक्षित आणि ड्रगमुक्त मांसाचे उत्पादन करता येईल. सध्या दररोज सुमारे 13 कोटी कोंबड्या आणि 40 लाख डुकरांना मारले जाते. पृथ्वीवर एकूण सस्तन जीवांमध्ये 60 टक्के प्राणी आहेत, 36 टक्के व्यक्ती आणि केवळ 4 टक्के जंगली जनावरे आहेत. परंतु, मांसाच्या मागणीसाठी जनावरांच्या हत्येमुळे जैव संतुलन बिघडत चालले आहे.

आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की, अखेर जनावरांना न मारता कशाप्रकारे मांसाचे उत्पादन केले जाईल. अमेरिकन कंपनी जस्ट ईट यासाठी 1200 लिटरच्या बायोरिअ‍ॅक्टरमध्ये अ‍ॅनिमल सेल्स म्हणजे पेशी तयार करेल आणि नंतर यामध्ये वनस्पतींशी संबंधित इनग्रेडिएंट मिसळेल. सुरुवातीला या उत्पादनाची उपलब्धता मर्यादित असेल. मात्र, कंपनीने म्हटले आहे की, लवकरच सिंगापूरच्या रेस्टॉरंटमध्येसुद्धा उत्पादने विकली जातील. जाहीरपणे, हे मांस पारंपरिक चिकनच्या तुलनेत जास्त महाग असेल, परंतु कंपनीचे म्हणणे आहे की, उत्पादनाचा स्तर वाढण्यासह त्याचे दर कमी होत जातील.

You might also like