वडिलांनी ‘शिक्षण’ सोडायला लावलं, आता कॅब चालक करतेय 12 वी चा ‘अभ्यास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियावर कधी काय ट्रेन्डमध्ये येईल सांगता येत नाही. सिंगापूरच्या एका उद्योगामी ओलिविया डेका यांनी आपल्या दिल्ली प्रवासादरम्यान एक बाब आपल्या फोलोवर्सशी शेअर केली. त्यांची हे प्रेरणादायी पोस्ट हजारो लोकांच्या पसंतीला उतरली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिल्लीत उबेर कॅब चालवणाऱ्या तरुणीची कथा शेअर केली, जिच्या वडीलांनी तिचे शिक्षण बंद केले, कारण ते आपल्या मुलीला पुढे शिकवू इच्छित नव्हते, परंतू ती आता कॅब चालवून आपल्या 12 वीच्या परिक्षेची तयारी करत आहे. सध्या तिची ही प्रेरणादायी कथा प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

ओलिवियाने 13 नोव्हेंबरला आपली पोस्ट लिहिली आहे. यात लिहिले की मी साकेत दिल्लीपासून गुडगावला जाण्यासाठी उबेर कॅब केली होती. तो दिवस मी विसरणार नाही. कारण त्या उबेर कारची ड्रायवर एक मोठं स्वप्न असलेली लहान मुलगी होती.

त्या मुलीचे नाव कोमल आहे आणि ती 10 वर्षांची आहे. घरी एक लहान आणि 2 मोठे भाऊ बहीण आहेत. लहानपणापासून कोमल अभ्यासात हुशार परंतू आता शिक्षण सुरु ठेवण्यासाठी तिला रस्त्यावर उबेर चालवावी लागते. मागील 1 वर्षांपासून ती कॅब चालवत आहे.

यंदाची 12 वीची बोर्डची परिक्षा देणार आहे. तिने तिच्या वडीलांमुळे शिक्षण सोडले होते. त्यामुळे तिने हे साहसी पाऊल उचचले आणि पुन्हा एकदा शिक्षणास सुरुवात केली. ओलिविया पुढे लिहिते की तिला आता कॉलेजला जायचे आहे आणि आयुष्यात बरेच काही करायचे आहे. वडीलांची इच्छा नाही की तिने उबेर चालवावी किंवा शिक्षण घ्यावे. परंतू ती शिक्षणासाठी कोणाचेही ऐकत नाही. ती स्वत: काही तरी करु इच्छीत आहे. लोक काय म्हणतील याकडे मी लक्ष देत नाही.

ओलिवियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की जीवन जगण्याची तिची जिद्द मला खूप आवडली. संपूर्ण जगात अशा मुली असणे आवश्यक आहे ज्या इतक्या हिम्मती आणि जिद्दीने जीवन जगत असतील. इतके दृष्टनिश्चयी असावे की आपल्या जीवनातील आव्हानाला रेसमध्ये मागे सोडून यशस्वी होतील. कोमल एक हिरो आहे जी आपली चमक सर्वत्र पसरवत आहे. त्यांनी लिहिले की मी आता तिच्या कायम संपर्कात राहिलं आणि आवश्यक तशी मदत करत राहिल. त्यांनी कोमलबरोबर सेल्फी देखील काढला.

Visit : Policenama.com