‘लैला मजनू’मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर झाला पतीला जीवे मारण्याचा आरोप आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंजीता कौर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काही रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे की, तिने आपल्या पतीला मारहाण केली आणि चौथ्या मजल्यावर धक्का देण्याचाही प्रयत्न केला. रंजिता कौर ही दुसरी तिसरी कोणी नसून जुन्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रंजिता कौर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सिनेमे केले आहेत. परंतु त्यांना म्युझिकल ब्लॉक बस्टर सिनेमा लैला मजनू साठी ओळखलं जात. या सिनेमात त्या ऋषी कपूर यांच्या सोबत दिसल्या होत्या.

रिपोर्टनुसार, रंजिता कौर यांच्या विरोधात त्यांचे पती राज मसंद यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान आता या प्रकरणाची खूप चर्चा झाल्यानंतर मात्र आता हे कुटुंब सर्व काही ठिक असल्याचं सांगत आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, राज मसंद यांनी सिनियर सिटीझन हेल्पलाईन द्वारे अॅक्ट्रेस रंजिता कौर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रंजिता कौर आणि त्यांचा मुलगा या दोघांनी मिळून राज मसंद यांना शारीरिक यातना दिल्या आहेत.

राज मसंद यांनी मागील आठवड्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. या त रंजित कौर यांनी मारहाण केल्याचा आणि जीवे मारण्याच्या गोष्टींचा समावेश आहे. राज यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, रंजिता आणि त्यांचा मुलगा स्काय यांनी त्यांना चौथ्या मजल्यावरून धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाला गंभीरपणे घेत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मसंद कुटुंबात विवादाला सुरुवात तेव्हा झाली जेव्हा राज मसंद यांनी त्यांच्या मुलाला पैसे देण्यास नकार दिला. राज यांचा मुलगा अमेरिकेत अभ्यास केल्यानंतर आता बिझनेस करत आहे. जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला पैसे देणं बंद केलं त्यानंतर खरी अडचण सुरु झाली. राज मसंद यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना धमकवायला सुरुवात केली. शिवाय याबाबत जेव्हा मीडियाने रंजिता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी याबाबत बोलण्यास मात्र नकार दिला.

परंतु आता हे प्रकरण वाढल्यानंतर रंजिता यांचं म्हणणंही समोर आलं आहे. रंजिता म्हणाल्या की, “प्रत्येक घरामध्ये अशी भांडणं होत असतात. माझे पती अमेरिकामध्ये काम करतात. माझा मुलगाही त्यांच्या सोबत काम करतो. जास्त काही नाही फक्त बिझनेसमध्ये काही किरकोळ वाद झाला होता. हो हे प्रकरण इतकं वाढलं की, माझ्या पतीने पोलिसांची मदत घेतली.

वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राज मसंद देखील आता म्हणत आहेत की, “हे प्रकरण बिझनेसवरुन घडलं होतं. मी या प्रकरणी तक्रार दाखल करु इच्छित नाही. पोलिसांनी आमचं काऊंसलिंग केलं आहे. सर्व काही आता ठिक आहे. या प्रकरणी पुण्यातील कोरगांव पार्क पोलिस ठाण्यातील इंस्पेक्टर मदन बहादरपुरे यांचं म्हणणं आहे की, कुटुंबाने आपापसात बोलून प्रकरण मिटवलं आहे.”