Lalit Patil Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lalit Patil Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयातील (Sassoon Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते (Medical Officer Dr. Praveen Devkate) यांना गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक केली. ललितला उपचारासाठी (Lalit Patil Drug Case) दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील (Yerawada Jail) डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील डॉ. देवकाते यांना अटक (Arrest) करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. देवकाते यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणी ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. देवकाते यांना सोमवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. चाकण येथे मेफेड्रोन (Mephedrone (MD) बाळगल्याप्रकरणी ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) होता. आजारी असल्याचा बहाणा करुन ललित ससून रुग्णालयात (Lalit Patil Drug Case) उपचारासाठी दाखल झाला होता. ललित ससूनमध्ये उपचार घेत असताना ललित पाटील हा ससून रुग्णालयातून मेफेड्रोनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेने २९ सप्टेंबर रोजी ससून परिसरात कारवाई करुन ललितच्या दोन साथीदारांना पकडले होते. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते़. या कारवाईतून ललित पाटील याचे कारनामे समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती़.

ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेल्याने याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरु झाली.
त्यातूनच शासनाने चौकशी समिती नेमली होती. समितीच्या शिफारसीनुसार डॉ. प्रविण देवकाते याला
निलंबित (Suspended) करण्यात आले तर, ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur)
यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला होता.

ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते (Mahendra Shewte), येरवडा कारागृहातील समुपदेशक (Counselor)
सुधाकर इंगळे (Sudhakar Ingle) यांना अटक करण्यात आली. तपासात डॉ. मरसाळे यांनी ललितला ससून रुग्णलायात
उपचारासाठी दाखल करण्याचे पत्र दिल्याचे निष्पन्न झाले. डॉ. मरसाळे यांनी ललितकडून पैसे घेतल्याचे
उघडकीस आल्यानंतर त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आता डॉ. प्रविण देवकाते याला अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bhidewada Smarak | ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात

आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी

तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”