भूमी अभिलेख कार्य़ालय ACB च्या रडारवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (बुधवारी) महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई केली. १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारताना अॅड. रोहीत शेंडे याला पकडण्यात आले. एवढी मोठी कारवाई केल्याने एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आणि सुहास नाडगौडा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, रोहीत हा फक्त एक प्यादा आहे असे वाटते. आजूनही भ्रष्टाचार हा वेगवेगळ्या पातळीवरुन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एसीबीने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मुख्य आरोपीला गजाआड करावे अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

लाच म्हटले कि नागरिकांच्या डोळ्यासमोर फक्त पोलिसच येतात. परंतु शासनाच्या इतर खात्यात देखील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. भूमी अभिलेख, पुर्नवसन, जिल्हाधीकारी कार्यालयात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून देखील भ्रष्टाचार उघड होण्याचे प्रमाण नगण्य आहे. या अशा भ्रष्टाचारामुळे शासनाच्या चांगल्या योजना गरीब तळागाळातील लोकांपर्यंत पोहचू शकत नाही व त्यांची अडवणूक होते. याकडे संबंधीत खाते प्रमुखाने पाहण्याची नितांत गरज आहे. एसीबीने काल केलेल्या कारवाईमुळे भूमी अभिलेख खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेंडे हा भूमी अभिलेख उपसंचालक वानखेडे यांचा मानस पुत्र आहे. तो वानखडे यांच्यासाठी खासगी एजंट म्हणून काम करीत होता. पुण्यात येण्या आगोदर वानखेडे हे ठाणे जिल्ह्यात असताना रोहीत शेंडे हा देखील ठाण्यात होता. ठाण्यामध्ये असताना रोहीतच्या मार्फत येणाऱ्याच फाईलची सुनावणी होत होती. असे अनेक वकिलांचे म्हणणे आहे. एसीबीने या अनुषंगाने तपास करण्याची गरज आहे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे. तसेच वानखडे यांच्या आत्तापर्य़ंतच्या कामाची चौकशी झाली पहिजे असे भूमी अभिलेख खात्यातील कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

फाईलची सुनावणी करण्यासाठी शेंडे याने १ कोटी ७० लाख रुपये घेतले. या रक्कमेतून शेंडे याला किती मिळणार होते. आणि उरलेली रक्कम कोणाच्या घशात जाणार होती हे तपासात समोर येईलच. परंतु शेंडे हा फक्त एक प्यादा आहे. मुख्य सुत्रधारापर्यंत पोहचून भूमी अभिलेख कार्य़ालयातील भ्रष्टाचार उघडकीस येणे गरजेचे आहे. एका फाईलसाठी १ कोटी ७० लाख रुपये घेतले जात असतील तर यापूर्वी निकाली काढण्यात आलेल्या फाईलसाठी किती रुपये घेतले असतील याचे मोजमाप करायलाच नको. या प्रकरणात असणाऱ्या सर्व आरोपींची चौकशी करुन त्यांच्या जंगम मालमत्ता देखील तपासावी असा सूर सध्या नागरिकांमधून आहे.