लासलगावचे मंडळ अधिकारी चंद्रशेखर नगरकर यांची नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव येथील मंडळ अधिकारी चंद्रशेखर नगरकर यांची नाशिक येथील महसूल आयुक्त कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल औरंगाबाद येथील न्यायाधीश सचिन न्याहारकर यांच्या हस्ते चंद्रशेखर नगरकर यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला तसेच त्यांच्या जागी नांदूर मध्यमेश्वर येथील मंडळ अधिकारी विजय आहेर यांनी तात्पुरता पदभार स्वीकारला असून त्यांचा सुद्धा या वेळी सत्कार करून स्वागत करण्यात आले.

यावेळी चंद्रशेखर नगरकर म्हणाले की लासलगाव मंडळाच्या महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच या मंडळातील असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी माझ्या कार्यकाळात मला खूप मोठे सहकार्य केले आहे हे मी कधीच विसरणार नसून या सर्वांचा मी नेहमीच ऋणी राहील.या पुढेही असेच सहकार्य येणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास देखील करावे अशी मी सर्वांना विनंती करतो

या प्रसंगी न्यायाधीश सचिन न्याहरकर,वेळापूर चे सरपंच नारायण पालवे,विशाल पालवे,विपिन ब्रम्हेचा,अमोल थोरे गणेश डोमाडे,गांगुर्डे सर आदी मित्रपरिवार उपस्थित होते

You might also like