खुशखबर ! वर्षभरातील सर्वात कमी किंमतीत मिळतंय पेट्रोल-डिझेल, 10 दिवसात झालं 1.85 रूपयांनी ‘स्वस्त’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये सुरु झालेल्या कोरोना व्हायरसमुळे कच्च्या तेलाच्या मागणीत झालेली घट यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूडच्या किमतीमध्ये वारंवार घसरण होत आहे. याचाच परिणाम भारतातील पेट्रोल डिझेलच्या दरांवर देखील दिसून येत आहे. शनिवारी देखील ही घसरण पहायला मिळाली.

दिल्लीमध्ये शनिवारी पेट्रोल 27 पैशांनी स्वस्त होऊन 74.16 रुपया इतका झाल्याचे आढळून आले आणि डिझेल 30 पैशानी स्वस्त होऊन 67.31 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे.नव्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत पेट्रोलचा दर 1.85 रुपयांनी कमी झालेला आहे.

12 जानेवारी नंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी घसरण
गेल्या 14 दिवसांमध्ये पेट्रोल 1.85 रुपये आणि डिझेल 1.86 रुपये इतके स्वस्त झाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑइलचा दर कमी होऊन 60.62 डॉलर प्रती बॅरलवर पोहचला आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 79.76 रुपये प्रति लिटरपर्यंत गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रति लिटर 70.56 रुपये आहे.

कोरोना व्हायरस आणि क्रूडचे काय आहे कनेक्शन
भारताप्रमाणेच चीनही आपले 90 टक्के क्रूड ऑइल म्हणजेच कच्चे तेल विदेशातील बाजारातून खरेदी करतो. आकडेवारीनुसार, 2019 मध्ये चीनने 50.6 कोटी टन कच्चे तेल विकत घेतले होते.

सध्या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये ही डिमांड कमी झालेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड 3 डॉलर प्रति बॅरल पर्यंत स्वस्त होऊ शकते. जानेवारी महिन्यात कच्चे तेल 12 टक्क्यांपर्यंत स्वस्त झालेले आहे.

काय ठरतात पेट्रोल डिझेलचे दर
पेट्रोल पंपवरून आपण ज्या किंमतीवर पेट्रोल खरेदी करतो ते मूळ किंमतीच्या 48 टक्के असते. यानंतर बेस किंमतीवर सुमारे 35 टक्के उत्पादन शुल्क, 15 टक्के विक्री कर आणि दोन टक्के कस्टम ड्युटी आकारली जाते.

काय आहे बेस प्राईझ
तेलाच्या किंमतीत कच्च्या तेलाची किंमत (क्रूड), प्रक्रिया शुल्क आणि कच्च्या तेलाला रिफाइन करणाऱ्या रिफायनरीजचे शुल्क यांचा समावेश आहे.

आतापर्यंत इंधनाला GST मध्ये समाविष्ठ केले गेलेले नाही. त्यामुळे यावर एक्साइज ड्यूटी देखील लागते आणि वॅट देखील लागतो.

फेसबुक पेज लाईक करा –