लातुर : सह संपर्क प्रमुखाचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

लातुर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश करत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.  अमित देशमुख आणि त्यांच्या चमू सोबत अभय साळुंके जेंव्हा पत्ररकारांना भेटले तेंव्हा नमस्कार करून सुरवात केली.

शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकत साळुंके म्हणाले, मी शिवसेनेत काम करत होतो भाजपा शेतकरी आणि लोकांच्या प्रश्नांबददल मी काँग्रेस च्या नेत्यांकडे गेलो तेंव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली जाते  त्या पद्धतीनं आम्हाला ही वागणूक देण्यात आली. आज शिवसेनेबद्दल काही बोलायची वेळ नाही. मी वेळ आल्यास नक्की यावर बोलेल. मी कधीच माझी श्रद्धा लपवली नव्हती अस मत अभय साळुंके यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान अमित देशमुख यांनी त्यांचं काँग्रेस पक्षात स्वागत केले. या मूळे काँग्रेस पक्षाला मोठी मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली. सामान्य लोकांसाठी लढणारा नेता असल्यानं आम्हाला निश्चित फायदा होईल निलंग्यात होणारी तूट आता भरून निघेल असं मत अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे. या वेळी अशोक पाटील निलंंगेकर उपस्थित होते.