नवरा-बायकोच्या वादात पुतण्या आणि भाच्याचा ‘हकनाक’ बळी !

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – नवरा-बायकोच्या भांडणात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. दुहेरी हत्याकांडाने लातूर शहर हादरलं असून घटनेतील दोन-तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण या नवरा-बायकोने भांडण झाल्यानंतर नातेवाईकांना बोलावल्यामुळे हा प्रकार घडला. भीमा चव्हाण हा लातूर येथील एमआयडीसीमध्ये मजुरी करत आहे तर ललिता चव्हाण एमआयडीसीमध्ये चहाची टपरी चालवते. या दोघांना दोन मुली, दोन मुले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण हे पती-पत्नी लातूर शहरातील भांबरी चौक येथे राहतात. त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते अनेकदा त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती.

28 ऑगस्ट रोजी झालेला वाद खूपच विकोपाला गेला. ललिता चव्हाणने आपला भाऊ बालाजी राठोडला फोन करुन बोलावून घेतलं होतं. त्याने आपल्याबरोबर आपले मित्र आणि नातलगांनाही आणले होते. तर भीमा चव्हाणनेही आपल्या गावावरून नातेवाईकांना बोलावले होते. त्यामुळे भांडण आणखीनच वाढले वादावादी आणि हाणामारीचा प्रकारही घडला. यात भीमा चव्हाण यांचा पुतण्या आनंद आणि भाचा अरुण यांच्यावर चाकूने हल्ला झाला. त्यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी दोन-तीन आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तयार करण्यात आली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like