‘या’ मोठ्या बँकेत सेव्हींग अकाऊंट उघडणार्‍या कोटयावधी ग्राहकांना मोठा झटका, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला. आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून बँकेच्या कोट्यावधी खातेदारांना आता बचत खात्यावर कमी व्याज मिळेल. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या बचत खात्यांवरील व्याज दर कमी केले आहेत. बँकेने रेपो रेटमधून लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर) मध्ये 0.40 टक्के कपात केली आहे. यानंतर बँकेतील आरएलएलआर 6.65 टक्के झाला आहे, जो आधी 7.05 टक्के होता.

1 जुलैपासून बँकेच्या बचत खात्यास वार्षिक जास्तीत जास्त 3.25 टक्के व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यात तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक वर वर्षाकाठी 3% आणि 50 लाखाहून अधिक रकमेवर वार्षिक 3.25 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेनेही बचत खात्याचे व्याज कमी केले होते.

पीएनबीने एफडी आणि बचत खात्यातील व्याज कमी केले

पीएनबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी घट केली आहे. आता बँकेच्या बचत खात्यावर 3.25 टक्के व्याज मिळेल, जे आधी 3.75 टक्के होते. पीएनबीच्या बचत खात्यात 50 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर वर्षाकाठी 3 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर पीएनबीच्या बचत खात्यात 50 लाखाहून अधिक रकमेवर वर्षाकाठी 3.25 टक्के व्याज मिळेल.

पंजाब नॅशनल बँक एफडीवर देते इतके व्याज:-

1 ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10%

2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10%

3 ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.30%

5 वर्षांच्या एफडी वर 5.40%

5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 5.40%