LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Revise Its Investment Policy | एलआयसी आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करणार आहे. ही सहा दशकांपेक्षा जास्त काळ सरकारची कंपनी होती. स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) लिस्ट झाल्यानंतर तिला नवीन प्रकारच्या नियमांचे पालन करावे लागेल. यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्ससह अनेक इतर गोष्टींचा समावेश आहे. लिस्टिंगनंतर तिच्यावर स्टॉक एक्सचेंजपासून इन्व्हेस्टर्सचे बारीक लक्ष होते. (LIC Revise Its Investment Policy)

 

एलआयसीने मोदी सरकारचा निर्गुंतवणूक कार्यक्रम पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. ती सरकारच्या बुडणार्‍या बँका वाचवण्यासाठी सुद्धा पुढे आली आहे. आता तिला गरजेपेक्षा जास्त रिस्क घ्यायची नाही आणि कॉर्पोरेट गव्हर्नंन्सवर जास्त लक्ष देण्याचा प्लान बनवला आहे. (LIC Revise Its Investment Policy)

 

एलआयसी देशातील सर्वात मोठी इन्श्युरन्स कंपनी आहे. तसेच ती संस्थात्मक गुंतवणुकदार सुद्धा आहे. तिने शेअरमध्ये 10 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. तिची एकुण संपत्ती अंडर मॅनेजमेंट सुमारे 41 लाख कोटी आहे. संबंधीत व्यक्तीने सांगितले की, एलआयसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांमधील आपली गुंतवणूक कमी करण्याचा विचार करत आहे. यामध्ये सिमेंट, पॉवर जनरेशन आणि पॉवर डिस्ट्रिब्यूशन कंपन्यांचा समावेश आहे.

 

त्यांनी म्हटले की, एलआयसीमध्ये नवीन बोर्ड तयार केले आहे. कंपनीच्या स्ट्रॅटेजीमध्ये कोणत्याही प्रकारच्या बदलासाठी बोर्डाची मंजूरी आवश्यक असेल. याबाबत प्रतिक्रियेसाठी एलआयसीला पाठवलेल्या ईमेलला उत्तर देण्यात आले नाही.

इन्श्युरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने लाईफ इन्श्युरन्स कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी नियम बनवले आहेत.
या अंतर्गत एका लाईफ इन्श्युरन्स कंपनीला आपल्या गुंतवणूकयोग्य एकुण सरप्लसच्या किमन 50 टक्के गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
15 टक्के इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधीत असेट्समध्ये करावी लागते. कंपनी उर्वरित 35 टक्के फंडची गुंतवणूक शेअर, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर, म्युच्युअल फंड्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटसह इतर गोष्टींमध्ये करण्यासाठी स्वातंत्र्य आहे.

 

एलआयसीने 4 मेरोजी आपला आयपीओ लाँच केला होता. हा इश्यू 9 मे रोजी बंद झाला होता.
हा इश्यू सुमारे तीन पट सबक्राईब झाला होता. या इश्यूमध्ये सर्वात जास्त रूची पॉलिसी होल्डर्सने दाखवली होती.
याचे कारण मिळणारे डिस्काऊंट होते. त्यांना प्रति शेअर 60 रूपयांचा डिस्काऊंट मिळाला होता,
परंतु कंपनीचा शेअर 17 मे रोजी कमजोरीसह लिस्ट झाला. तेव्हापासून शेअर सातत्याने घसरत आहे.

 

Web Title :- LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

 

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

 

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’