MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – MP Udayanraje Bhosale | पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात (Lal Mahal) अभिनेत्री वैष्णवी पाटीलने (Vaishnavi Patil) चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर वैष्णवी पाटीलसह चौघांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. संभाजी ब्रिगेड संघटनेने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणात खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी थेट इशारा दिला आहे.

उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) म्हणाले, ”खरं तर लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाहीये. मात्र, या ठिकाणी कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक अथवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. मात्र, या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचे आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, ” असं ते म्हणाले.

दरम्यान, चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक होताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवीने म्हटले आहे की, ”पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर व्हिडीओ शूट केला, लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागते,” असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट केला आहे.

Web Title :  MP Udayanraje Bhosale | mp udayan raje bhosale has given a warning
as the planting was done in the lal mahal of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर