फायद्याची गोष्ट ! LIC ची नवीन पॉलिसी – दररोज फक्त 28 रूपये ‘बचत’ करा अन् ‘मिळवा’ 50 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा निगमने मागच्या वर्षी एक नवीन टर्म प्लॅन लाँच केला आहे. एलआयसी टेक टर्म ही एक नॉन लिंक्ड, नॉन-प्रॉफिट ऑनलाईन टर्म इन्शुरन्स पॉलिसी असून जी विमा घेणाऱ्या कुटुंबात कोणाचाही अचानक मृत्यू झाल्यावर आर्थिक संरक्षण प्रदान करते. या नवीन टर्म इन्शुरन्स अंतर्गत पहिल्या वर्षात अपघात, आत्महत्या किंवा कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या मृत्यूवर संरक्षण दिले जाते. एलआयसीचा हा टर्म इन्शुरन्स केवळ भारतीय लोकांसाठी असून अप्रवासी भारतीय याचा लाभ घेऊ शकत नाही.

LIC टेक टर्मचे फीचर्स काय आहेत ?
LIC चा टेक टर्म प्लॅन पूर्णपणे एक टर्म इन्शुरन्स आहे, ज्यात जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पैसे दिले जातात. हा लाभ पॉलिसीच्या मुदतीच्या काळातच उपलब्ध असून या इन्शुरन्सच्या परिपक्वतेवर पॉलिसी होल्डर जर जिवंत राहिला तर त्याला काहीही दिले जात नाही. शुद्ध टर्म इन्शुरन्सची किंमत खूपच कमी असते आणि या अधिक रकमेच्या योजना आहेत.

या टर्म इन्शुरन्सवर किमान निश्चित रक्कम ५० लाख रु. असेल. यात कोणतीही मर्यादा नसेल. जर एखाद्या पॉलिसी धारकाने इन्कम प्रूफ दिले तर त्याच्यासाठी जास्त रक्कम असू शकते. सगळ्या पॉलिसी धारकांकडे पर्याय असेल कि ते सहा महिन्याला, वर्षाला किंवा सिंगल प्रीमियमचा पर्याय निवडू शकतात. या टर्म इन्शुरन्ससाठी किमान कालावधी १० वर्ष आणि जास्तीत जास्त ५० वर्ष असेल. तर पॉलिसी अंतर्गत वय ८० वर्ष असेल. पॉलिसीधारक धूम्रपान करतो कि नाही यावरही प्रीमियम रेट अवलंबून आहे.

किती प्रीमियम द्यावा लागेल ?
जर कोणी ३० वर्षाचे असेल आणि पुढच्या ३० वर्षासाठी ही पॉलिसी घेऊन ५० लाख रु. च्या विमा रकमेची निवड करते तर यासाठी वर्षाला ९,९१२ रु. प्रीमियम असेल. यात जीएसटीही शामिल असेल. जर विमा रक्कम १ कोटी आहे तर वर्षाला १७,४४५ रु. प्रीमियम असेल.

कसा खरेदी करू शकता एलआयसी टेक टर्म प्लॅन?
एलआयसी टेक टर्म प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला भारतीय जीवन विमा निगमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्हाला सगळी महत्वाची माहिती द्यावी लागेल, पेमेंट करावे लागेल आणि आपल्या पत्त्यावर डॉक्युमेंट्स येईपर्यंत वाट पाहावी लागेल. तुम्ही प्रीमियम नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, AMEX कार्ड, UPI, IMPS किंवा e-Wallet द्वारे भरू शकता. जर क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावा लागेल.