पुणे : शस्त्र परवान्यावर खाडाखोड केल्याप्रकरणी पोलिस आयुक्तालयातील लिपिक पवार यांच्यासह भिंताडेला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शस्त्र परवान्यावर खाडाखोड केल्याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तालयातील लिपिक आणि शस्त्र परवाना धारकाला आज अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिक अमर केशव पवार आणि परवानाधारक राजेंद्र काशिनाथ भिंताडे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शस्त्र परवान्यावर खाडाखोड करण्यासाठी भिंताडे याने लिपिक पवार याला 25 हजार रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये शस्त्र परवाना शाखेत नेमणुकीस असलेल्या अमर पवार याने राजेंद्र भिंताडे याच्याकडून 25 हजार रुपये घेऊन बेकायदेशीर आणि जाणीवपूवर्क शस्त्र परवान्याची क्षेत्रवाढ करून दिली. शस्त्र परवान्याची क्षेत्रवाढ करून देणे हे त्याच्या अधिकारात नसताना देखील पवार याने भिंताडे याच्याकडून पैसे घेऊन त्याचा शस्त्र परवान्याचे क्षेत्र वाढवून दिले.
राजेंद्र भिंताडे याच्या शस्त्र परवान्यावर खाडाखोड करून त्याचे क्षेत्र संपूर्ण देशात करून दिले. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाच्या शासकीय अभिलेखावर खाडाखोड करून बनावट नोंद केली. तपासामध्ये राजेंद्र भिंताडे याने बनावट परवाना खरा म्हणून वापरल्याचे उघड झाले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
visit : policenama.com
- तुमच्या मनाला आवडणारे उपाय करून सांभाळा फिटनेस, असा होईल फायदा
- केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘हे’ उपाय करून दूर करा समस्या
- मोजे काढताच पायांची दुर्गंधी येत असल्यास करा ‘हे’ खास उपाय, समस्या होईल दूर
- हे’ फळ खाल्ल्यानंतर कधीही पिऊ नका पाणी, जाणून घ्या कारण
- असे ठेवा तुमच्या रागावर नियंत्रण, या खास टिप्स नेहमी ठेवा लक्षात
- या’ सवयी असतील तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो ‘ब्लॅडर कॅन्सर’
- ‘हे’ १० गंभीर आजार ऐन तारुण्यातही मुला-मुलींना होऊ शकतात, अशी घ्या काळजी
- मासिक पाळी उशिरा येण्यासाठी करा ‘हे’ ८ नैसर्गिक उपाय, ‘नो साइड इफेक्ट’
- बॉडी बनविण्यासाठी घाम गाळायची गरज नाही, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा
- ‘हे’ मधुमेहावर आहे रामबाण औषध, ‘हा’ सोपा उपाय करा, जाणून घ्या इतर फायदे