Liver | तुमच्या ‘या’ 5 वाईट सवयी डॅमेज करत आहेत लिव्हर, लवकर करा सुधारणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Liver | शरीराचे योग्य फंक्शन आणि टॉक्सिन फ्री ठेवण्यात लिव्हरची खुप महत्त्वाची भूमिका असते. लिव्हरची (Liver) सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते खराब झालेल्या पेशी आपोआप रिप्लेस करते. मात्र, एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर, लिव्हरची स्वतः दुरुस्ती करण्याची क्षमता संपुष्टात येऊ लागते. विशेषतः तेव्हा जेव्हा आपण सतत त्याचे नुकसान करणार्‍या सवयी सुरू ठेवतो.

 

लोकांमध्ये लिव्हरच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक लिव्हर दिन साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच 8 वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लिव्हर झपाट्याने खराब होते.

 

लिव्हर डॅमेज होण्याची कारणे (Causes Of Liver Damage)

1. औषधांचा अतिवापर (Drug Overdose)
लिव्हर तोंडाद्वारे शरीरात जाणारी औषधे, औषधी वनस्पती आणि सप्लीमेंटचे विघटन करण्याचे काम करते. मात्र, या गोष्टींचे जास्त सेवन केल्याने संथ गतीने लिव्हरचे नुकसान होते. तुमच्या या चुकीमुळे लिव्हर (Liver) निकामी होऊ शकते.

 

2. कमी झोप (Less Sleep)
झोपेची कमतरता सुद्धा लिव्हरसाठी खूप हानिकारक ठरू शकते. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की एखाद्या व्यक्तीच्या खराब झोपेमुळे लिव्हरवर ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर दिवसातून सुमारे 8 तास झोपण्याचा सल्ला देतात.

3. लठ्ठपणा आणि खराब न्यूट्रिशन (Obesity And Poor Nutrition)
खाण्याच्या चुकीच्या सवयी देखील काही काळानंतर आपले लिव्हर खराब करू लागतात. जास्त कॅलरी असलेले अन्न, ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट आणि साखर यासारख्या गोष्टींच्या अतिसेवनामुळे लिव्हरवर चरबी जमा होऊ लागते. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. त्यामुळे लठ्ठपणासोबतच खाण्याच्या वाईट सवयींवरही नियंत्रण ठेवा.

 

4. खूप जास्त व्हिटॅमिन ए (Too Much Vitamin A)
आपल्या शरीराला व्हिटॅमिन ए खूप आवश्यक असते आणि सर्वोत्तम पर्याय म्हणजे ताजी फळे आणि भाज्यांनी ती भरून काढता येते. यामध्ये लाल, केशरी आणि पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्या अधिक फायदेशीर मानल्या जातात. परंतु जर तुम्ही व्हिटॅमिन-ए चा हाय डोस असलेले सप्लिमेंट घेतले तर ते तुमच्या लिव्हरसाठी घातक ठरू शकते. म्हणून, ते घेण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

5. दारू – सिगारेट (Alcohol – Cigarettes)
वाईट सवय तुमच्या लिव्हरचे नुकसान करतात. अल्कोहोल आणि तंबाखू लिव्हरच्या टॉक्सिन बाहेर काढून टाकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात.
अलीकडील अभ्यासानुसार, जे लोक दिवसातून तीन ग्लास दारू पितात त्यांना लिव्हरचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Liver | biggest mistakes that could damage your liver

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Low Blood Sugar | व्हिटामिन-D च्या कमतरतेने होते लो ब्लड शुगर, जाणून घ्या ताबडतोब शुगर लेव्हल वाढवण्यासाठी काय करावे

 

Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ 3 गोष्टींचे करू शकता सेवन; जाणून घ्या

 

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी इन्सुलिनपेक्षा कमी नाहीत ‘या’ 6 पाच वनस्पती, वाढू देत नाहीत ब्लड शुगर