Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ 3 गोष्टींचे करू शकता सेवन; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्याने हा आजार होतो. वारंवार लघवी होणे, तहान वाढणे, अस्वस्थता, थकवा, वजन कमी होणे, हात-पायांमध्ये मुंग्या येणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. मधुमेही रुग्णांनी गोड पदार्थ टाळावेत. तसेच दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल आणि साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर दररोज या 3 गोष्टींचे सेवन करा. जाणून घेऊया (Blood Sugar) –

 

1. जांभळाच्या बिया
जांभळामध्ये फायबर, मॅग्नेशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचबरोबर जांभळाच्या बियांचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जातो. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्या अनेक आजारांवर फायदेशीर आहेत.

 

विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया वरदानापेक्षा कमी नाहीत. यासाठी जांभळाच्या बिया चांगल्या प्रकारे कोरड्या कराव्यात. यानंतर जांभळाच्या बिया बारीक करून पावडर तयार करा. आता ही पावडर रोज सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत घ्या. (Blood Sugar)

2. तुळस
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी तुळस फायदेशीर ठरते. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे शुगरसाठी उपयुक्त ठरतात. तसेच तुळशीच्या सेवनाने इन्सुलिन वाढते.

 

यासाठी रोज तुळशीचा चहा प्या. याशिवाय तुळशीची पाने बारीक करून एक चमचा तुळशीचा रस पिऊ शकता.
मात्र, तुळशीच्या रसाच्या प्रमाणाबाबत एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

3. आंब्याची पाने
यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि पेक्टिन असते, जे मधुमेहासाठी फायदेशीर आहे.
यासाठी आंब्याची पाने ही मधुमेही रुग्णांसाठी संजीवनी बुटीच्या बरोबरीची आहे.

 

याच्या वापराने ब्लड शुगरवर त्वरित नियंत्रण मिळते. यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळून काढा तयार करा.
आंब्याच्या पानांचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने जास्त फायदा होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | diabetes patients should consume these 3 things daily to control blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Low Blood Sugar | व्हिटामिन-D च्या कमतरतेने होते लो ब्लड शुगर, जाणून घ्या ताबडतोब शुगर लेव्हल वाढवण्यासाठी काय करावे

 

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी इन्सुलिनपेक्षा कमी नाहीत ‘या’ 6 पाच वनस्पती, वाढू देत नाहीत ब्लड शुगर

 

Pune Crime | गुंतवणुकीवर अवास्तव नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसरमधील तरूणाची साडेपाच लाखांची फसवणुक