Liver Killers Foods | ‘लिव्हर किलर’ आहेत हे ६ फूड्स, आतून करतात शरीराचे जबरदस्त नुकसान

नवी दिल्ली : Liver Killers Foods | लिव्हर शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जे हजारो फंक्शन कंट्रोल करते. तसेच आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्याची काळजी न घेतल्यास अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागते. डेली लाईफमध्ये आपण अशा अनेक अनहेल्दी पदार्थांचे सेवन करतो, ज्यामुळे आरोग्याचे मोठे नुकसान होते (Foods That Can Damage Liver).

लिव्हर डॅमेज करणाऱ्या गोष्टी

१. जंक फूड (Junk Food)
जंक फूड, फास्ट फूड (Fast Food) आणि प्रोसेस्ड पदार्थ खाल्ल्याने लिव्हरला प्रमाणापेक्षा जास्त ट्रान्स फॅट्स मिळते. जर तुम्ही चवीसाठी त्याचे सेवन केले तर लिव्हर डॅमेज होऊ शकते.

२. दारू (Alcohol)
सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत दारू पिण्याचे व्यसन जडले आहे, त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात, तसेच त्यामुळे लिव्हर सिरोसिस होऊ शकतो.

३. साखर (Sugar)
मिठाई, सरबत, आइस्क्रीम आणि केक इत्यादीमध्ये रिफाइंड शुगर अति प्रमाणात असते, ज्यामुळे लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होते आणि नंतर हा अवयव डॅमेज होऊ शकतो. (Liver Killers Foods)

४. फ्राईड फूड (Fried Food)
फ्रेंच फ्राईज, चिप्स, समोसे, कचोरी आणि भजी तळण्यासाठी भरपूर तेल वापरले जाते, ज्यामुळे लिव्हरला खूप नुकसान होऊ शकते.

५. बटाटा
बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते कारण तो इतर अनेक भाज्या आणि रेसिपीमध्ये मिसळून खाल्ला जातो, जर तुम्ही चवीसाठी त्याचे जास्त सेवन केले तर लिव्हरमध्ये समस्या उद्भवू शकतात.

६. चहा-कॉफी (Tea and Coffee)
भारतात चहा-कॉफीच्या शौकिनांची कमतरता नाही, पण जर हे कॅफीनयुक्त पेय जास्त प्रमाणात प्यायल्यास लिव्हरची हानी होऊ शकते.

लिव्हरसाठी कोणते फूड्स फायदेशीर?
लिव्हर डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी, हेल्दी फूडसची निवड करावी लागते. यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे, लसूण आणि धान्य खाऊ शकता. यामुळे लिव्हरचे फंक्शन योग्य राहून अनेक धोके टाळता येतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | प्रलंबित पेन्शन प्रकरणे निकाली काढण्याचा 7 दिवसांचा अल्टिमेटम

Radhakrishna Vikhe Patil | ‘शरद पवार आंदोलकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत’, विखे पाटलांचा गंभीर आरोप

Maratha Reservation Protest | शांततेने सुरू असलेले जालन्यातील आंदोलन पेटले कसे?